किती रूपयांना मिळते एक ईव्हीएम मशीन, जाणून घ्या किती येतो एकूण खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 02:52 PM2024-04-15T14:52:50+5:302024-04-15T14:53:32+5:30
आज आम्ही ईव्हीएमसंबंधी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. जसे की, ईव्हीएमची किंमत आणि ही मशीन बनवायला किती खर्च लागतो.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. त्यासोबतच ईव्हीएम मशीनचीही वेगवेगळ्या कारणाने चर्चा सुरू आहे. देशात आता ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान होतं. असं म्हटलं जातं की, ईव्हीएम मशीनमुळे देशातील निवडणुकीचा खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे ईव्हीएमचं महत्व वाढलं आहे. आज आम्ही ईव्हीएमसंबंधी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. जसे की, ईव्हीएमची किंमत आणि ही मशीन बनवायला किती खर्च लागतो.
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईवीएम) मतदान करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. ही मशीन एका पाच मीटरच्या वायरने जुळलेली असते. त्याशिवाय याचा कंट्रोल यूनिट पीठासीन अधिकारी किंवा मतदान अधिकाऱ्याकडे असतो. तर वोटिंग यूनिटला वोटिंग बॉक्समध्ये ठेवलं जातं. भारतात ईव्हीएमचा वापर पहिल्यांदा 1982 मध्ये केरळच्या परूर विधानसभा भागात झाला.
ईव्हीएममध्ये पेपर बॅलेट दिलं जात नाही. तर कंट्रोल यूनिटचे प्रभारी मतदान अधिकारी कंट्रोल यूनिटवर बॅलेट बटन दाबून एक बॅलेट जारी करतात. त्यानंतर मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराला किंवा चिन्हा समोरील बटन दाबून आपलं मत देतात.
ईवीएमची किंमत
एका माहितीनुसार, एक एम 2 ईव्हीएमची किंमत 8,670 रुपये होती. तेच एक एम3 ईव्हीएमची किंमत जवळपास 17,000 रूपये असते. त्याशिवाय मोठ्या संख्येने ईव्हीएम बनवण्यात खूप खर्च लागतो. पण दर निवडणुकीत लाखो मतपत्रिकेची छपाई, ते ठेवण्याची व्यवस्था इत्यादीसाठी लागणारा खर्च वाचतो. मतदान केंद्रावरही यामुळे कमी कर्मचारी लागतात.