पृथ्वीच्या आत आता किती सोनं शिल्लक आणि कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त सोनं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 11:50 AM2024-04-04T11:50:34+5:302024-04-04T11:50:58+5:30
Gold on Earth : आता पृथ्वीवर किती सोनं शिल्लक आहे? तसेच सगळ्यात जास्त सोनं कोणत्या देशाकडे आहे?
Gold on Earth : सोन्याची चकाकी सगळ्यांना आवडते. अनेकांना सोन्याचे दागिने घालणं आवडतं. खासकरून महिला यात पुढे असतात. आजच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणंही सगळ्यात चांगलं मानलं जातं. जगातील बरेच देश आपल्याकडे सोनं रिजर्व करून ठेवतात. ज्याव्दारे ते दुसऱ्या देशांसोबत व्यापारही करतात. जगात अनेक सोन्याच्या खाणीही आहेत. पण आता पृथ्वीवर किती सोनं शिल्लक आहे? तसेच सगळ्यात जास्त सोनं कोणत्या देशाकडे आहे?
पृथ्वीच्या आत किती सोनं शिल्लक
बीबीसीच्या 2020 च्या रिपोर्टनुसार, अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेने अंदाज लावला आहे की, पृथ्वीच्या आत आता 50 हजार टन सोनं रिजर्व आहे. हे सोनं बाहेर काढणं बाकी आहे. तेच साधारण 1,90,000 टन सोनं आतापर्यंत खाणींमधून काढण्यात आलं आहे. पण हा केवळ अंदाजे आकडा आहे. जगात सगळ्यात जास्त सोनं साऊथ आफ्रिकेतील विटवॉटर्सरैंड बेसिन इथून काढण्यात आलं आहे. इथे जगातील 30 टक्के खोदकाम झालं आहे. तर सगळ्यात मोठी सोन्याची खाणं अमेरिकेच्या नवादामध्ये आहे.
कोणत्या देशाकडे सगळ्यात जास्त सोनं?
फोर्ब्स इंडियाच्या मार्च 2024 च्या एका रिपोर्टनुसार, वर्ल्ड गोल्ड काउंसिल ने 2023 च्या चौथ्या क्वार्टरच्या हिशेबाने सांगितलं की, अमेरिकेकडे सगळ्यात जास्त सोनं आहे. या देशाकडे 8,133.46 टन सोन्याचा भांडार आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर जर्मनी आहे. या देशाकडे 3,352.65 टन गोल्ड रिजर्व आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर इटली आहे. त्यांच्याकडे 2,451.84 टन गोल्ड आहे. भारताकडे 803.58 टन गोल्ड रिजर्व आहे.
पृथ्वीच्या कोरमध्ये इतकं सोनं
वैज्ञानिकांनी एक आश्चर्यकारक बाब सांगितलं आहे. एका थेअरीनुसार पृथ्वीच्या गर्भा म्हणजे पृथ्वीच्या कोरमध्ये इतकं सोनं आहे की, त्याच्या 4 मीटर जाड थराने पृथ्वी झाकली जाऊ शकते. पण पृथ्वीच्या कोरमध्ये खोदकाम करण सध्या शक्य नाही. मनुष्य अजून तेवढे खोल पोहोचू शकले नाही की, त्यांना पृथ्वीच्या स्थितीबाबत सगळं काही समजू शकेल.