माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:49 PM2022-06-14T12:49:07+5:302022-06-14T12:52:24+5:30

कमी झोप मिळाली तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण पाहणारच आहोत. पण त्याचबरोबर झोपेबाबत काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्सही जाणून घेणार आहोत.

how much time man is alive if not slept? sound sleep is necessary for good health | माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर

माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर

googlenewsNext

काहीजणांना जास्त वेळ झोपण्याची सवय असते. तर काहीजणांना झोपच येत नाही. त्यांना निद्रानाशासारखे त्रास होतात. पण माणसाला ८ तासांची झोप आवश्यकच असते. जर त्यापेक्षा कमी झोप मिळाली तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण पाहणारच आहोत. पण त्याचबरोबर झोपेबाबत काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्सही जाणून घेणार आहोत.

एखादा माणूस आपल्या आयुष्याचा एक तृतियांश भाग झोपेसाठी खर्ची करतो. पण यात त्याने व्यवस्थित झोप घेतली नाही तर त्याला त्रास होण्याचेही चान्सेस असतात. ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या माणसांना सर्दी लगेच होते. तसेच झोपेत माणसाची वास घेण्याची शक्ती पूर्णपणे नाहीशी होते. म्हणजेच तुम्ही झोपेत असताना तुम्हाला कोणताच वास येत नाही. तुम्हाला जर वास आला म्हणजे तुम्ही झोपलेले नाहीत.

झोप ही प्रत्येक माणसासाठी आवश्यक गोष्ट असते. ज्याप्रकारे अन्नपाण्यावाचून राहिल्यास काहीच दिवसांत व्यक्तीचा मृत्यू होतो तसेच झोपेबाबतही आहे. होय हे खरं आहे, जर तुम्ही सलग १२ दिवस झोपला नाहीत तर तुमचा मृत्यू होऊ शकतो.  झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जर एखाद्या माणसाची झोप नीट झाली नसेल तर त्याचा दिवस अत्यंत वाईट जातो. त्याची चिडचिड होते. आपण पुरेशी झोप घेतली तर पुन्हा नव्या जोमाने दिनचर्या पार पडण्यास सज्ज होतो.

Web Title: how much time man is alive if not slept? sound sleep is necessary for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.