चक्क घरातला कचरा ऑनलाईन विकून लोक मिळवतायत भरपूर पैसे, जाणून घ्या कसं 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:20 PM2019-12-30T17:20:46+5:302019-12-30T17:26:38+5:30

घरात जर कचरा  किंवा अनावश्यक सामान पडून राहिलं असेल तर खूप  अडचण वाटत असते.

How people can get lots of money by selling household garbage online | चक्क घरातला कचरा ऑनलाईन विकून लोक मिळवतायत भरपूर पैसे, जाणून घ्या कसं 

चक्क घरातला कचरा ऑनलाईन विकून लोक मिळवतायत भरपूर पैसे, जाणून घ्या कसं 

Next

घरात जर कचरा  किंवा अनावश्यक सामान पडून राहिलं असेल तर खूप  अडचण वाटत असते. घरातल्या वेगवेगळ्या भागात आपल्या नकळतपणे खूप सामान गोळा होत जातं असतं, त्याचप्रमाणे सतत नवीन कपडे किंवा घरातल्या वस्तू घेत राहिल्यामुळे नकळतपणे जुन्या आणि वापरात नसलेल्या वस्तूंचा खूप कचरा जमा होत जातो आणि कामाच्या गडबडीत असताना तो सगळा कचरा  साफ करण्यासाठी वेळ सुध्दा मिळत नाही.  

सध्याच्या काळात तुम्ही ऑनलाईन राहून कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. एका क्लीकवर आपली अनेक कामं होत असतात. मोबाईलचा आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील कचरा विकू शकता. एव्ढचं नाही तर तोच कचरा विकल्याचे तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत.  चेन्नई या ठिकाणचा रहिवासी असलेल्या एका मुलाने  प्रत्येकाच्या घरातील कचरा जमा करण्यासाठी आणि विकण्यासाठी शक्कल लढवली  आहे. त्यासाठी या मुलाने  एक स्वतंत्र वेबसाईट सुद्धा सुरू केली आहे.  त्या वेबसाईटला 'Madras Waste Exchange’ असे नाव देण्यात आले आहे. ग्रेटर चेन्नई असोशीयेशच्या सहकार्याने याचे अ‍ॅपसुद्धा सुरू केले आहे. 

कचरा व्यवस्थापनासाठी या अ‍ॅपचा वापर होणार आहे तसंच कचरा विकणारा व्यक्ती त्याची खरेदी करणारी संस्था किंवा कंपनी यांच्यात ताळमेळ राहण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन  सगळ्यांना मोफत वापरता येणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या अ‍ॅपमध्ये आत्तापर्यंत ७०० खरेदीदार आणि  ३०० विक्रेत्यांनी रजिस्टर केले आहे. या  कचऱ्याअंतर्गत प्लास्टिकसह थर्माकॉल आणि काचेच्या तुकड्यांचा सुध्दा समावेश असणार आहे. तसंच बाजारभावाप्रमाणेच कचऱ्याची विक्री आणि खरेदी होणार आहे. पर्यावरणात स्वच्छता राखणे हे  संकल्पनेमागचं उद्द्दीष्ट आहे. घरात  नको असलेला कचरा  कंपन्यांनी विकत घेतला तर रिसायकल करता येणार आहे. तसंच डंपिग ग्राउंडमुळे वाढणारी समस्या आटोक्यात येणार आहे.

Web Title: How people can get lots of money by selling household garbage online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.