'देवा'सोबत संपर्क करण्यास 'या' गोष्टी वापरत होते लोक, खोदकामात सापडल्या अशा वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:34 PM2024-02-12T13:34:32+5:302024-02-12T13:37:09+5:30

इथे अशा काही वस्तू मिळाल्या ज्यांचा वापर 'दिव्य प्राण्यांसोबत' संपर्क करण्यासाठी केला जात होता.

How people contact with god in ancient time reveals things found at burial site old city | 'देवा'सोबत संपर्क करण्यास 'या' गोष्टी वापरत होते लोक, खोदकामात सापडल्या अशा वस्तू

'देवा'सोबत संपर्क करण्यास 'या' गोष्टी वापरत होते लोक, खोदकामात सापडल्या अशा वस्तू

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये अशा ठिकाणी खोदकाम सुरू असतं ज्या प्राचीन आहेत. यात अनेक अशा गोष्टी मिळतात ज्या प्राचीन सभ्यतांचे रहस्य उलगडतात. असंच एक खोदकाम चीनमध्ये झालं. इथे अशा काही वस्तू मिळाल्या ज्यांचा वापर 'दिव्य प्राण्यांसोबत' संपर्क करण्यासाठी केला जात होता. चीनच्या हेनान प्रांतातील पुयांगमध्ये स्थित एका ठिकाणी खोदकाम करण्यात आलं.

इथे गण नावाचं प्राचीन शहर असायचं. खोदकामात बुद्धीबळाच्या खेळातील मोहरे आणि 10 हड्ड्या सापडल्या. हड्ड्या पॉलिश करण्यात आल्या होत्या आणि त्यांवर काही चित्रेही होती. यावर प्राचीन चिनी अंक कोरण्यात आले होते. 

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एशिअन ओरिजन्सच्या हवाल्याने लिहिण्यात आलं की, असं मानलं जातं की, या हाडांचे तुकडे अशा पवित्र वस्तू होते ज्यांचा वापर भविष्य सांगण्यासाठी किंवा देवता किंवा प्राण्यांना संपर्क करण्यासाठी आयोजित धार्मिक कार्यात केला जात होता. 

चिनी संस्कृतीचे एक्सपर्ट जिओंग गॅंग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितलं की, हाडांचे तुकडे कदाचित 'भविष्य सांगणाऱ्या क्रिया' आणि 'प्राचीन काळात होणाऱ्या बळी समारोहात होत असेल'. ते असंही म्हणाले की, पश्चिमी हानच्या राजवंशात अशाप्रकारच्या हाडांचा वापर केला जात असेल. बुद्धीबळातील वस्तू मिळणंही अजब आहे. यातून चिनी लोकांची आलिशान जीवनशैली आणि मकबरच्या मालकाची सामाजिक स्थिती दर्शवतात.

या प्राचीन शहरामध्ये खोदकाम प्रोव्हिंशिअल इन्स्टिट्यू ऑफ कल्चरल हेरिटेज अॅन्ड आर्कियोलॉजीने केलं. इन्स्टिट्यूटचे रिसर्चर ली यिपी म्हणाले की, नव्या शोधामुळे येणाऱ्या काळात इतिहासातील अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येण्यास मदत मिळेल.

Web Title: How people contact with god in ancient time reveals things found at burial site old city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.