130 वर्षाआधी कशी शार्प केली जात होती पेन्सिल, शार्पनर बघून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:28 PM2023-09-04T16:28:51+5:302023-09-04T16:30:44+5:30
जेव्हाही मनुष्य एखाद्या गोष्टीचा शोध लावतात तेव्हा ती आणखी चांगली करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
गरज ही अविष्काराची जननी आहे असं म्हटलं जातं. मनुष्यांना जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज पडते तेव्हा ते आपल्या सुविधेसाठी ती गोष्ट तयार करतात. आगीपासून ते अनेक गोष्टींचा असाच शोध लावण्यात आला. जेव्हाही मनुष्य एखाद्या गोष्टीचा शोध लावतात तेव्हा ती आणखी चांगली करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
बालपणी किंवा आजही काही कामानिमित्त तुम्ही शार्पनरचा वापर करत असाल. छोटासा शार्पनर पेन्सिलची नोक शार्प करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, पेन्सिलच्या बॉक्समध्ये सहजपणे बसणारं हे शार्पनर आधी इतकं लहान नव्हतं.
सोशल मीडियावर शार्पनरच्या बदलत्या रूपाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात 1830 ते 2023 पर्यंतचा शार्पनरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. 1830 ज्या शार्पनरचा वापर होत होता तो बघून तर तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल. नंतर कालांतराने यात बदल होत गेले.