मसाले किचनमध्ये येण्याआधी कसे दिसतात? शेतात बघितले तर ओळखताही येणार नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:55 PM2024-01-13T12:55:42+5:302024-01-13T12:56:17+5:30
जर हे मसाले तुम्हाला शेतात दिसले तर तुम्ही ओळखूही शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
भारतीय किचनमध्ये नेहमीच वेगवेगळे मसाले असतात. त्यांशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. कधी खडा मसाला असतो तर कधी पावडरच्या रूपात. पण हे मसाले किचनमध्ये येण्याआधी कसे दिसतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. जर हे मसाले तुम्हाला शेतात दिसले तर तुम्ही ओळखूही शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
काळे मिरे
काळे मिरे सगळ्यांच्याच घरात असतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, ते फळांसारखे झाडांवर लागतात. सगळे काळे मिरे एकाच झाडावर पायपर नायग्रममधून तयार होतात. ते नंतर उन्हात सुकवले जातात.
जिरं
जिरं हे क्युमिनम सायमिनम प्रजातीच्या झाडाचं बी असतं. ही फळं हातांनीच तोडली जातात. देशातील 80 टक्के जिरं गुजरात आणि राजस्थानमधून निघतं.
जायफळ
जायफळ मीरीस्टिका फ्रेगरेंस नावाच्या एका झाडातून तोडलं जातं. हे इंडोनेशियातील एक मूळ फळ आहे. अंडाकार आकाराच्या या फळाला सुकवलं जातं. तेल काढण्यासाठी जायफळाच्या बियांवर कीटक सोडले जातात. कीटक बियांमधून स्टार्च आणि फॅट काढून टाकतात.
वेलची
वेलचीचं झाड 1 ते 2 फूट उंच असतं. याची शेती केरळ, कर्नाटक आणि तामिलनाडुमध्ये केली जाते. फळं पिकल्यानंतर तोडले जातात आणि नंतर सुकवले जातात. हिरवी वेलची हिरवी असल्यावरच तोडली जाते आणि काळी वेलची उशीरा तोडली जाते.
तिळ
तिळाचं झाड सामान्यपणे एक मीटर उंच असतं. जेव्हा ते पूर्णपणे भरतात तेव्हा मोहरीसारखं त्यांना काढलं जातं. फोटोत तुम्ही बघू शकता की, कच्चे तिळ कसे दिसतात.
केसर
केसरचं झाड अनेकांनी पाहिलं असेल, केसर एका फुलासारखं असतं. ज्यातून कळ्या उमलतात. त्या सुकवल्या जातात. केसर सगळ्यात महाग मसाल्यांपैकी एक आहे.