तुम्ही पित असलेलं बॉटलचं पाणी शुद्ध की अशुद्ध कसं ओळखाल? जाणून घ्या ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 03:22 PM2023-11-18T15:22:55+5:302023-11-18T15:23:47+5:30

Viral Video : आधी बाहेर जाताना लोक घरातूनच पिण्याचं पाणी सोबत नेत होते. पण आता बाहेर सहजपणे बॉटलमध्ये पिण्याचं पाणी मिळतं.

How to check water in bottle is good or bad | तुम्ही पित असलेलं बॉटलचं पाणी शुद्ध की अशुद्ध कसं ओळखाल? जाणून घ्या ट्रिक

तुम्ही पित असलेलं बॉटलचं पाणी शुद्ध की अशुद्ध कसं ओळखाल? जाणून घ्या ट्रिक

Viral Video : आधीच्या काळात सगळं काही नॅच्युरल असायचं. लोकांना लहान लागली तर आरामात ते नदीचं किंवा विहिरीतील पाणी पित होते. पण काळानुसार मनुष्याने प्रगतीच्या नावावर प्रदुषण वाढवलं. या परिणाम असा झाला की, नदी-नाल्यांचं पाणी दूषित झालं. आता तर घरी येणारं पिण्याचं पाणीही सुरक्षित नसतं. घराघरात आरओ लावल्यानंतरही दूषित पाण्याची समस्या बघायला मिळते.

आधी बाहेर जाताना लोक घरातूनच पिण्याचं पाणी सोबत नेत होते. पण आता बाहेर सहजपणे बॉटलमध्ये पिण्याचं पाणी मिळतं. पण यातही आता फसवणूक होत आहे. मिनरल वॉटरच्या नावावर दूषित पाणी विकलं जात आहे. हे पाणी शुद्ध मिनरल वॉटल समजून आपण पितो. पण यामुळे तुम्हाला नुकसान होतं.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, आपण हे कसं चेक करावं की, पाणी चांगलं आहे की दूषित आहे. आजकाल अनेक लोक बॉटलमध्ये दूषित पाणी भरून विकतात. हे पाणी पिऊन तुमचं आरोग्य बिघडू शकतं. अशात हे पाणी चांगलं आहे की, खराब हे कसं ओळखावं?

जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की, जे पाणी तुम्ही विकत घेत आहात ते खरंच चांगलं आहे किंवा नाही. तर तुम्ही हे एका अॅपच्या माध्यमातून चेक करू शकता. तुम्हाला मोबाइलमध्ये BIS CARE नावाचं एक अॅप डाउनलोड करावं लागेल. हे उघडल्यानंतर याच्या व्हेरिफाय लायसन्स डिटेल सेक्शनमध्ये जा. बॉटलवर एक कोड लिहिलेला असेल तो अॅपमध्ये टाका आणि त्यानंतर तुम्हाला बॉटलचे सगळे डिटेल्स मिळतील. बॉटल कुठे पॅक झाली, यातील पाणी मिनरल आहे की नाही हे सगळं समजेल.

Web Title: How to check water in bottle is good or bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.