जीन्स स्वच्छ कशी करावी? एक्सपर्ट का म्हणतात फ्रीजमध्ये ठेवावी? कारण जाणून तुम्हीही हेच कराला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:13 AM2023-05-30T10:13:08+5:302023-05-30T10:13:51+5:30
जीन्स वारंवार धुणे अयोग्य... जीन्स कशा प्रकारे स्वच्छ करावी...? फ्रिजमध्ये का ठेवायला हवी जीन्स...? जाणून घ्या...
कपडे हा आपल्या दैनंदीन जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आजकाल तर महिलादेखील जीन्स आणि शर्ट परिधान करताना दिसतात. खरे तर आज जीन्स हा महिला आणि पुरुष या दोघांसाठीही एक महत्वाचा पोशाख बनला आहे. मुली शर्ट आणि टी-शर्ट दोन्हीसोबतही जीन्स वापरतात. जीन्सची एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण ती अगदी रफ-टफ वापरू शकता. लोक प्रवासापासून ते ऑफिसपर्यंत सर्वत्र जीन्सचा वापर करताना दिसतात.
महत्वाचे म्हणजे, बहुतांश लोक जीन्सची योग्य प्रकारे कालजी घेत नाहीत. काही लोक तर जीन्सच्या काळजी पोटी ती वारंवार धुताना दिसतात. पण असे करणे योग्य आहे? जीन्सची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ तिला फ्रीजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. पण जीन्स फ्रीजमध्ये ठेवल्याने नेमके काय होते? जाणून घ्या...
जीन्स वारंवार धुणे अयोग्य -
जीन्स वारंवार धुणे, तिच्या फॅब्रिकसाठी योग्य नाही. एक्सपर्ट्सच्या मते जीन्स वारंवार धुवू नये, जे लोक असे करतात ते चुकीचे आहे. जगातील पहिली जीन्स तयार करणारी कंपनी आणि जगातील प्रसिद्ध जीन्स कंपनी लेव्हिसच्या वेबसाइटवरील एका ब्लॉगमध्ये सांगण्यात आले होते की, जीन्स कधीही धुवू नये. जर फारच आवश्यकता असेल तरच असे करा.
जीन्स कशा प्रकारे स्वच्छ करावी? -
आता आपल्या मनात नक्कीच असा प्रश्न आला असेल की, जीन्स धुवायची नाही, तर स्वच्छ कशी करायची? तर लेव्हीस कंपनीचे चिप बर्ग म्हणतात, जीन्सवरील कुठलाही डाग टूथब्रशने साफ करण्याचा प्रयत्न करा. जीन्स धुतल्याने तिचे फेब्रिक खराब होते.
फ्रिजमध्ये का ठेवायला हवी जीन्स? -
चिप बर्ग यांच्या मते, नवी जीन्स पहिल्यांदा किमान 6 महिन्यांनंतरच धुवायला हवी. जीन्समधील बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी जीन्स रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवावी आणि ती सकाळी फ्रीजमधून काढून उन्हात आणि स्वच्छ वातावरणात वाळवावी. यानंतर ती बॅक्टेरिया मुक्त होईल आणि मग आपण ही वापरू शकता.