न मारता मुंग्या किंवा मुंगळ्यांना घरातून कसे पळवाल? जाणून घ्या खास सोपे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 11:56 AM2022-12-08T11:56:49+5:302022-12-08T11:58:23+5:30
How To Control Ants Entry At Your Home: जर मुंगळे किंवा मुंग्या कुणाला चावल्या तर खाजही येते आणि वेदनाही होते. मुंगळे जेवणाच्या शोधात घरात येतात. हे घरातून दूर करायचे असेल तर काही खास उपाय करावे लागतात.
How To Control Ants Entry At Your Home: आपल्यांपैकी कचाचितच कुणी असेल ज्यांच्या घरात मुंगळे किंवा मुंग्या येत नाहीत. घरातील कोपऱ्यांपासून ते किचन आणि बेडवरही काळे मुंगळे किंवा लाल मुंग्या बघायला मिळतात. जर मुंगळे किंवा मुंग्या कुणाला चावल्या तर खाजही येते आणि वेदनाही होते. मुंगळे जेवणाच्या शोधात घरात येतात. हे घरातून दूर करायचे असेल तर काही खास उपाय करावे लागतात.
मिठाचं पाणी
घरात जिथे मुंगळे किंवा मुंग्यांनी थैमान घातलं आहे तिथे मिठाचं पाणी शिंपडा. हा यांना पळवण्याचा नॅच्युरल उपाय आहे. हवं तर मीठ पाण्यात टाकून उकडून घ्या आणि हे लिक्विड बॉटलमध्ये टाकून स्प्रे करा. याने मुंगळे किंवा मुंग्या घरात येणार नाहीत.
लिंबू
लिंबू आणि लिंबूच्या सालीचा वापर मुंग्या पळवण्यासाठी केला जाऊ शकतो. घरातील लादी पुसताना पाण्यात लिंबाचा रस टाका. याच्या सुंगधाने मुंग्या किंवा मुंगळे घरात येणार नाहीत. तसेच लिंबाची साल तुम्ही घरातील कानाकोपऱ्यात ठेवू शकता.
व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगर तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि मग यात पाणी मिक्स करा. जिथे जिथे मुंग्या किंवा मुंगळे येतात तिथे स्प्रे करा. याच्या वासाने मुंगळे-मुंग्या पळून जातात.
काळे मिरे
हे फार कमी लोकांना माहीत आहे की, मुंग्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यामुळे त्याच्या शोधात त्या कुठेही जातात. तेच या किड्यांना तिखट आणि कडू पदार्थ अजिबात आवडत नाही. त्यामुळे जिथे मुंग्या किंवा मुंगळे आहेत तिथे काळ्या मिऱ्याची पावडर टाका.