पावसाळ्यात येणारा कपड्यांचा वास दूर कसा कराल? जाणून घ्या बेस्ट घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:57 PM2024-07-11T13:57:01+5:302024-07-11T13:57:59+5:30

पावसाळा सुरु होताच कपड्यांना एक वेगळाच दमट वास येतो. अनेकदा घाम आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यानेही हा वास येतो. त्यामुळे अनेकांना चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो.

How to get rid of bad smell from clothes in monsoon | पावसाळ्यात येणारा कपड्यांचा वास दूर कसा कराल? जाणून घ्या बेस्ट घरगुती उपाय!

पावसाळ्यात येणारा कपड्यांचा वास दूर कसा कराल? जाणून घ्या बेस्ट घरगुती उपाय!

पावसाळ्यात उन्ह कमी असल्याने कपडे वाळायला समस्या होतात. या दिवसात धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या फारच त्रासदायक ठरते. यामुळे तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. पण हा त्रास काही घरगुती उपायांनी कमी केला जाऊ शकतो. 

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी का येते?

पावसाळा सुरु होताच कपड्यांना एक वेगळाच दमट वास येतो. अनेकदा घाम आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यानेही हा वास येतो. त्यामुळे अनेकांना चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. अशात यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही ही दुर्गंधी दूर होत नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

कपड्या धुतल्यानंतर चांगले पिळायला हवे

पावसाळ्या उन कमी पडतं त्यामुळे सुकायला घातलेल्या कपड्यांचा वास यायला लागतो. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगल्याप्रकारे निघायला हवं. कपड्यांमधील पाणी पूर्णपणे निघालं ते फॅनच्या हवेत सुकायला ठेवा.

इस्त्री करा

धुतलेल्या कपड्यांमध्ये आताही वास येत असेल तर ते कपडे वापरण्याआधी एकदा इस्त्री करा. किंवा रात्रीच त्या कपड्यांना इस्त्री करुन फॅनच्या हवेखाली ठेवा. इस्त्री केल्यामुळे कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जातो.

कपडे उघड्यावर ठेवा

अनेकडा पावसाळ्यात घरात एकप्रकारचं दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कपड्यांनाही एक वेगळाच वास यायला लागतो. अशावेळी धुतलेले कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा मोकळ्या हवेत ठेवा.

परफ्युम-डिओड्रन्ट

पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओचा वापर करा. बाहेर जाताना बॅगमध्ये डिओ सोबत ठेवा. कपड्यांचा अधिकच वास येत असेल तर डिओचा वापर करु शकता.

एक्स्ट्रा कपडे ठेवा

पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपड्यांची एक जोडी सोबत ठेवा. कारण पावसात भिजल्यानंतर कितीही डिओचा वापर केला तरी कपड्यांना वास येतोच. त्यामुळे सोबत कपडे सोबत ठेवल्यास ते तुम्ही बदलू शकता.  

या गोष्टींचीही घ्या काळजी

१) पावसाळ्यात उन्ह कमी पडत असल्याने कपडे कमी धुवायला काढले तर चांगलं. 

२) कपडे सुकवण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करा. हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांखाली न्यूज पेपर ठेवा. पेपर पाणी शोषूण घेतो. 

३) कपडे धुतल्यानंतर काही वेळ पाणी झरण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर ते मोकळ्या जागेत सुकायला ठेवा.

Web Title: How to get rid of bad smell from clothes in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.