21 ग्रॅम असतं मनुष्याच्या आत्म्याचं वजन, डॉक्टरचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 02:38 PM2023-09-05T14:38:28+5:302023-09-05T14:39:50+5:30

विज्ञानाकडे या गोष्टीचं कोणतंही ठोस प्रमाण नाही की, आत्म्यासारखी एखादी बाब आहे आणि शरीरात प्रवेश करते व निघून जाते.

Human soul weight 21 grams claims doctor after research | 21 ग्रॅम असतं मनुष्याच्या आत्म्याचं वजन, डॉक्टरचा अजब दावा

21 ग्रॅम असतं मनुष्याच्या आत्म्याचं वजन, डॉक्टरचा अजब दावा

googlenewsNext

शरीर आणि शरीराच्या आत्म्याबाबत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. पण आजपर्यंत हे कुणीही योग्यपणे जाणून घेऊ शकलं नाही की, आत्मा काय आहे आणि ती मृत्यूनंतर निघून जाते. विज्ञानाकडे या गोष्टीचं कोणतंही ठोस प्रमाण नाही की, आत्म्यासारखी एखादी बाब आहे आणि शरीरात प्रवेश करते व निघून जाते. पण तरीही एका रिसर्चमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की, आत्म्याचंही वजन असतं.

आत्म्याच्या थेअरीला जगभरातील अनेक धार्मिक ग्रंथांनी स्वीकारलं आहे. याच थेअरीवर काम करताना 1909 मध्ये डकनडॉगल नावाच्या एका डॉक्टरांनी आपल्या 4 साथीदारांसोबत मिळून एक प्रयोग केला. त्यांनी मृत्यूच्या दारात असलेल्या काही रूग्णांवर हा प्रयोग केला. त्यांनी मृत्यूच्या आधी आणि नंतर त्यांचं वजन केलं, जे बरंच बदललं होतं.

आत्म्याच्या वजनाचा अजब दावा

या प्रयोगाचे मुख्य डॉक्टर डंकनडॉगल यांच्यानुसार, एकूण 6 रूग्णांवर प्रयोग करण्यात आला. ज्यांचं वजन मृत्यूआधी आणि नंतर वेगळं होतं. हे अंतर केवळ 21 ग्रॅमचं होतं. त्यांच्या वजनात आलेली 21 ग्रॅमची कमीच आत्म्याचं वजन मानण्यात आलं. कारण हे सगळ्या रूग्णांमध्ये एकसारखं होतं. 

पण रूग्णांचं वजन वेगवेगळे होतं. मात्र, सगळ्यांचे शरीर 21 ग्रॅमनेच हलके झालेत, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर डंकन यांनी क्रॉस चेक करण्यासाठी श्वानांवरही हा प्रयोग केला. पण यावेळी निष्कर्ष वेगळा होता. श्वानांच्या वजनात जीवंत असताना आणि मृत्यूनंतर काहीच फरक दिसला नाही.

रिसर्चवर प्रश्नचिन्ह

श्वानांवर प्रयोग केल्यानंतर या थेअरीवर चर्चा सुरू झाली. ज्यात अनेक लोकांनी सांगितलं की, जनावरांचा आत्माच नसते. पण सनातन धर्म आणि वैज्ञानिकांनुसार, सगळ्याच जीवांमध्ये आत्मा असते. ज्यामुळे ते चालू-फिरू शकतात. डॉक्टर डंकन यांच्या या रिसर्चला जगभरातील अनेक डॉक्टरांनी स्वीकारण्यास नकार दिला. हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं काही जण म्हणाले.

Web Title: Human soul weight 21 grams claims doctor after research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.