बोंबला! हनीमून दरम्यान रंगेहाथ दुसऱ्या महिलेसोबत पकडला गेला पती, पत्नी हॉटेलमध्ये झोपली होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:38 AM2022-08-29T11:38:36+5:302022-08-29T11:39:13+5:30
Crime news: यातील अजब बाब म्हणजे मोबाइलवर जी जाहिरात पाहून तो एका सुंदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत होता, तिला पोलिसांनी आपलं अंडरकव्हर एजंट म्हणून पाठवलं होतं.
US Crime news: अमेरिकेच्या (America) फ्लोरिडामध्ये (Florida) हनीमूनवर गेलेल्या एका नवरदेवाला अटक करण्यात आली. कारण तो त्याच्या नव्या नवरीला दगा देण्याच्या तयारीत होता. पतीवर हा आरोप आहे की, तो त्याच्या पतीला सोडून एका सेक्स वर्करसोबत (Sex Worker) शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत होता. यातील अजब बाब म्हणजे मोबाइलवर जी जाहिरात पाहून तो एका सुंदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या तयारीत होता, तिला पोलिसांनी आपलं अंडरकव्हर एजंट म्हणून पाठवलं होतं.
'द वीकली मेल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, फ्लोरिडामध्ये हनीमूनसाठी गेलेल्या तरूणाला सेक्स वर्करसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची हौस इतकी महागात पडली की, त्याला तुरूंगात रात्र काढावी लागली आणि आपल्या पत्नीच्या नजरेतूनही पडला. आरोपी पतीला तेव्हा अटक करण्यात आली जेव्हा तो फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या प्रॉस्टिट्यूशन स्टिंगच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे पोलिसांनी केल्याने पतीला त्याच्या हनीमूनच्या रात्री पत्नीला वेळ देण्याऐवजी तुरूंगात रात्र काढावी लागली.
आरोपी पतीचं वय 34 वर्षे आहे, तो त्याच्या पत्नीसोबत हनीमूनवर आला होता. यादरम्यान त्याच्या मोबाइल फोनवर स्टिंग करत असलेल्या अंडरकव्हर डिटेक्टिवकडून पाठवण्यात आलेला एक मेसेज आला. ज्यात सेक्स वर्करची माहिती देण्यात आली होती. जेव्हा त्याची नवी नवरी थकव्यामुळे झोपली होती तेव्हा त्याने या संधीचा फायदा घेण्याचा विचार केला. त्याने जाहिरातीला रिप्लाय दिला.
दुसरीकडून लगेच पत्ता पाठवला गेला आणि बोलवण्यात आलं. तेव्हा तो पत्नीला हॉटेलच्या रूममध्ये झोपलेला सोडून पत्त्यावर पोहोचला आणि तेव्हाच त्याला पकडण्यात आलं. दरम्यान सेक्स क्राइम थांबवण्यासाठी पोलिसांनी ह्यूमन ट्रॅफिकिंग विंगने आपल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये 176 लोकांना अटक केली. यावर्षी एप्रिलपासून ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.