कमाल! पत्नीला घटस्फोट देऊन पती झाला मालामाल, मिळणार 66 कोटी रूपये; पत्नी दरवर्षी देणार 61 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:20 PM2023-05-31T14:20:03+5:302023-05-31T14:20:40+5:30
सामान्यपणे पतीच घटस्फोटानंतर पत्नीला पैसे देतात. पण एक या उलट घटना समोर आली आहे. एक पत्नी आपल्या पतीला मोठी रक्कम देणार आहे.
अब्जाधीश लोकांच्या घटस्फोटांच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. कुणी पत्नीला पोटगी म्हणून अब्जो रूपये दिले तर कुणी कोट्यावधी रूपये. काही वर्षाआधी जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जेफ बेजोस यांनी पत्नी घटस्फोट दिल्यावर 38 अब्ज डॉलर म्हणजे 2.6 लाख कोटी रूपये दिले होते. सामान्यपणे पतीच घटस्फोटानंतर पत्नीला पैसे देतात. पण एक या उलट घटना समोर आली आहे. एक पत्नी आपल्या पतीला मोठी रक्कम देणार आहे.
ही घटना लंडनच्या एक उद्योगपती घराण्यातील आहे. लुईस बॅकस्ट्रॉम आणि मार्टिन वेनबर्ग यांचं लग्न सहा वर्षाआधी झालं होतं. प्रकरण कोर्टात गेलं तेव्हा वेनबर्ग म्हणाला की, त्याला 4 अब्ज रूपये हवेत. यासाठी त्यांनी वेगवेगळे तर्क दिले. पत्नीच्या कंपनीत काम करण्याचाही हवाला दिला. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली. तरीही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लेस्ली सॅमुअल्स म्हणाले की, लग्नाच्या आधीच्या अटींनुसारच पैसे द्यावे लागतील.
किती आहे पत्नीकडे संपत्ती?
कोर्टाने बॅकस्ट्रॉमला आदेश दिला की, तिने वेगळा राहत असलेल्या पतीला 6.5 मिलियन पाउंड म्हणजे साधारण 66 कोटी रूपयांचं पॅकेज द्यावं. सोबतच त्याला रोजच्या खर्चासाठी 60 हजार पाउंड म्हणजे साधारण 61 लाख रूपये दरवर्षी त्याला देत रहावे.
दरम्यान जेव्हा लग्न झालं तेव्हा बॅकस्ट्रॉम बिल्टिमा फाउंडेशनची अध्यक्ष होती. बिर्गमा होल्डिंग्स (हॉंगकॉंग) लिमिटेडमध्येही तिचे शेअर होते. या दोन्ही कंपन्या तिच्या आजोबांनी सुरू केल्या होत्या. सध्या तिच्याकडे जवळपास 25 अब्ज रूपयांची संपत्ती आहे. तर वेबवर्गची संपत्ती केवळ 2 कोटी रूपये होती.
सामान्य नव्हतं नातं
कोर्टाने सांगितलं की, दोघांचं लग्न झालं होतं. पण त्यांचं नातं सामान्य नव्हतं. दोघेही वेगवेगळे राहत होते. वेगवेगळ्या पार्ट्यांना जात होते. न्यायाधीश म्हणाले की, वेनबर्ग असा कोणताही पुरावा सादर केला नाही की, त्याची संपत्ती तेव्हा इतकी जास्त होती की, इतक्या पैशांचा तो दावा करू शकेल. त्याने त्याच्या आर्थिक स्थितीचाही खुलासा केला नाही. पुन्हा पुन्हा माहिती मागूनही त्याने दिली नाही. बॅकस्ट्रामने हा कोर्टाचा अपमान मानत त्याला शिक्षा देण्याचीही मागणी केली होती.