बोॆंबला! पतीनेच रचली स्वत:च्या किडनॅपिंगची कहाणी, नंतर गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडला गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:34 PM2023-01-17T12:34:28+5:302023-01-17T12:34:42+5:30

Husband Caught With Girlfriend : बराच शोध घेतल्यानंतर त्याला नव्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी जसं त्याला पकडलं त्याने सगळी कहाणी सांगितली.

Husband caught with girlfriend after reporting of fake kidnapping | बोॆंबला! पतीनेच रचली स्वत:च्या किडनॅपिंगची कहाणी, नंतर गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडला गेला

बोॆंबला! पतीनेच रचली स्वत:च्या किडनॅपिंगची कहाणी, नंतर गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडला गेला

Next

Husband Caught With Girlfriend : एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी आपल्याच किडनॅपिंगचा असा काही प्लान केला की, पोलिसांची टीमही हैराण झाली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना लाखो रूपये खर्चही करावे लागले. शेवटी तो त्याच्या  गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडला गेला. तेव्हा त्याचा भांडाफोड झाला आणि नंतर त्याने सगळं सत्य कबूल केलं.

ही घटना ऑस्ट्रेलियाच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे राहणारी एक व्यक्ती 31 डिसेंबरला रात्री आपल्या पत्नीला हे सांगून बाहेर गेला की, तो काही वस्तू घेऊन येईल. पण तो नंतर परत आलाच नाही. नंतर त्याच्या पत्नीला फोन आला की, तिच्या पतीला किडनॅप केलं आहे. पत्नीकडे खंडणी मागितली गेली.

दुसरी पोलीस स्टेशनमध्येही एक फोन गेला आणि त्यांनाही सांगण्यात आलं की, या या व्यक्तीला किडनॅप केलं गेलं आहे. पोलिसांच्या टीमने या केसची चौकशी सुरू केली. तेव्हा हळूहळू एक एक धागा उकलत गेला. नंतर असं समोर आलं की, तो त्याच्या गर्लफ्रेंडकडे राहण्यासाठी किडनॅप झाला आहे. त्याने स्वत:च खोटी कहाणी रचली होती. आता पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याचा शोध घेऊ लागले होते.

बराच शोध घेतल्यानंतर त्याला नव्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी जसं त्याला पकडलं त्याने सगळी कहाणी सांगितली. अशीही माहिती समोर आली की, पोलिसांना त्याला पकडण्यासाठी 20 लाख रूपये खर्च केले. या केसवर कारवाई सुरू आहे.

Web Title: Husband caught with girlfriend after reporting of fake kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.