खात्यात 8 कोटी येताच नवरा बदलला, गुपचूप केलं 'हे' काम; बायकोने शिकवला चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 04:35 PM2023-02-12T16:35:15+5:302023-02-12T16:36:35+5:30

एका व्यक्तीला तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली. कर कपात केल्यानंतर त्यांच्या खात्यात 8 कोटींहून अधिक रक्कम आली. मात्र इतके पैसे मिळूनही त्याने हा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला नाही.

husband changed after 8 crores rs came in bank account wife taught lesson divorce compensation | खात्यात 8 कोटी येताच नवरा बदलला, गुपचूप केलं 'हे' काम; बायकोने शिकवला चांगलाच धडा

खात्यात 8 कोटी येताच नवरा बदलला, गुपचूप केलं 'हे' काम; बायकोने शिकवला चांगलाच धडा

googlenewsNext

एका व्यक्तीला तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली. कर कपात केल्यानंतर त्यांच्या खात्यात 8 कोटींहून अधिक रक्कम आली. मात्र इतके पैसे मिळूनही त्याने हा प्रकार आपल्या पत्नीला सांगितला नाही. उलट त्याने या रकमेतील मोठा हिस्सा त्याची बहीण आणि एक्स वाईफला दिला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. आता या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आला आहे.

Hangzhou Daily रिपोर्टनुसार, झोउ (आडनाव) नावाच्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी 10 मिलियन युआन (12 कोटी रुपये) ची लॉटरी जिंकली होती. कर वगैरे वजा केल्यावर त्याला 8.43 मिलियन युआन (8 कोटी) मिळाले. नंतर, झोउने गुपचूप 2 मिलियन युआन त्याच्या बहिणीच्या खात्यात ट्रान्सफर केले आणि फ्लॅट खरेदी करण्यासाठी 70 हजार युआन त्याच्या एक्स पत्नीला दिले. झोउने त्याची तत्कालीन पत्नी लिनला पैसे मिळल्याबद्दल किंवा इतरांना पैसे देण्याबद्दल सांगितले नव्हते. 

लिनला जेव्हा अशा परिस्थितीत हा धक्कादायक प्रकार कळला तेव्हा तिने संतापून आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी कोर्टात केस दाखल केली. एवढेच नाही तर तिने घटस्फोटाचा अर्जही दाखल केला. या प्रकरणात, गेल्या आठवड्यात निर्णय आला, ज्यामध्ये कोर्टाने लॉटरीत मिळालेल्या रकमेपैकी दोन तृतीयांश रक्कम लिनला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. 

झोउने त्याची बहीण आणि माजी पत्नीला दिलेल्या पैशात लिनचा वाटा असल्याचे न्यायालयाला आढळले. सध्या कोणत्याही पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील केलेले नाही. झोउने लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यासाठी लिनचे पैसे वापरले होते, अशी माहिती मिळाली. पण बक्षीस जिंकल्यानंतर त्याला एकट्यालाच पैशाचा आनंद घ्यायचा होता. पण पत्नीसमोर त्याचा खेळ फार काळ टिकू शकला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: husband changed after 8 crores rs came in bank account wife taught lesson divorce compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.