शब्द देऊनही पतीने केलं नाही 'हे' काम, संतापलेली पत्नी घटस्फोट घेण्याच्या तयारीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 04:15 PM2024-09-28T16:15:34+5:302024-09-28T16:36:36+5:30
घटस्फोटांची काही कारणं तर अशी असतात ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. असंच एक घटस्फोटाचं कारण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Wife Demands Divorce: नेहमीच पती-पत्नीच्या घटस्फोटांची अजब अजब कारणं समोर येत असतात. कधी या घटना देशातील असतात तर कधी परदेशातील. घटस्फोटांची काही कारणं तर अशी असतात ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते. असंच एक घटस्फोटाचं कारण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ब्रिटनमधील एका महिलेला घटस्फोट हवा आहे कारण तिच्या पतीने रात्री तिच्यासाठी जेवण बनवलं नाही. तो सुट्टीवर घरीच होता आणि घरातील कामात मदतही करत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने पुढे सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून तिला ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबावं लागत आहे. अशात तिच्या पतीने प्रॉमिस केलं होतं की, तो रात्रीचं जेवण बनवेल. जेव्हा ती १२ तास काम करून घरी आली तर जेवायला काहीच नव्हतं. जेव्हा तिने पतीला याचं कारण विचारलं तर अजब कारण सांगितलं. तो म्हणाले की, त्याचं मन नव्हतं आणि त्यामुळे त्याने जेवण बनवलं नाही.
यूट्यूब बघतो, एकही काम करत नाही
मिरर ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार, तिचा पती रिकाम्या वेळेत यूट्यूबवर व्हिडीओ बघतो किंवा झोपा काढतो. महिलेने अनेकदा त्याला समजावाण्याचा प्रयत्न केला की, घरातील कामात त्याने मदत करणं गरजेचं आहे. पण त्याने काही ऐकलं नाही. कधी कधी तिचा पती या विषयावरून चिडचिडही करत होता. मात्र, एका रात्री जेव्हा शब्द देऊनही त्याने जेवण बनवलं नाही तर स्थिती आणखी बिघडली.
रागाच्या भरात पत्नीने केलं असं काही...
महिलेने सांगितलं की, तिने स्वत:साठी हॉटेलमधून जेवण मागवलं. तिने तिच्या पतीसाठी जेवण बनवलंही नाही आणि बाहेरून मागवलं सुद्धा नाही. महिलेने पुढे सांगितलं की, जर तिचा पती तिचा सन्मान करू शकत नाही तर ती सुद्धा करणार नाही. यानंतर महिलेने जास्त जेवण तयार करून घरात ठेवलं. जेणेकरून तिला उशीरा आल्यावर काही करण्याची गरज पडू नये. तेव्हा तिच्या पतीने ते सगळं जेवण संपवलं. आता पती सुधरायला तयार नसल्याने महिलेने कथितपणे घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.