बायको नवऱ्याला म्हणाली, माझं दुसऱ्यावर प्रेम आहे; त्यानंतर जे काही घडलं त्याने सगळेच हैराण झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 09:41 AM2021-10-30T09:41:48+5:302021-10-30T09:42:06+5:30
उत्तर प्रदेशात राहणाऱ्या पंकजचं ६ महिन्यांपूर्वी कोमल नावाच्या मुलीसोबत लग्न झालं होतं.
कानपूर – जिल्ह्यात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. याठिकाणी एका पतीने स्वत:च्या पत्नीला दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली. पत्नी ज्या मुलावर प्रेम करत होती त्याच्यासोबत पतीने तिचं लग्न लावून दिलं आहे. हम दिल दे चुके सनम या हिंदी सिनेमासारखी ही कहानी लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. पत्नीच्या सुखासाठी पतीने पुढाकार घेत तिला नव्या आयुष्याचा मार्ग दाखवला आहे.
प्रियकरासोबत पत्नीचं लग्न लावलं
उत्तर प्रदेशात राहणाऱ्या पंकजचं ६ महिन्यांपूर्वी कोमल नावाच्या मुलीसोबत लग्न झालं होतं. परंतु लग्नानंतर एकदा पत्नीने पतीला ती दुसऱ्या मुलाला पसंत करत असल्याचं सांगितले. पतीला पत्नीच्या मनातलं कळाल्यानंतर त्याने काहीही वाद न घालता पत्नीच्या लग्नाच्या बंधनातून मुक्त केले. पतीने सर्वात आधी पत्नीला घटस्फोट दिला त्यानंतर स्वत: पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावलं. पतीने केलेल्या या कृत्याची चर्चा गावभर सुरु आहे.
या प्रकारानंतर पत्नी कोमलनं तिच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, लग्नाच्या काही दिवसानंतरच मी माझ्या प्रियकराबाबत पतीला सांगितले होते. मी दुसऱ्यावर प्रेम करते. तेव्हा तू त्याच्यासोबत खुश असशील तर ठीक आहे. दुसरं लग्न माझ्या नशिबाचा खेळ आहे. ज्या प्रियकरासोबत कोमलचं लग्न झालं तो म्हणाला की, मी कोमलशी लग्न करण्याचं स्वप्न सोडून दिलं होतं. जेव्हा कोमलचं लग्न झालं तेव्हा सगळं काही संपलं असं मला वाटलं परंतु आता मला माझं प्रेम पुन्हा मिळालं आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.
पंकजनं त्याची पत्नी कोमलचं लग्न लावून देताना सर्व नियमांचे पालन केले. सुरुवातीला त्याने कोमलला घटस्फोट दिला त्यानंतर सरकारी संस्था आशा ज्योती केंद्रात कोमलच्या दुसऱ्या लग्नाची सर्व कागदपत्रे तयार केली. स्वत: पंकज कोमलासाठी वकील घेऊन लग्नाला पोहचला होता. या लग्नाबाबत आशा ज्योती केंद्राच्या अध्यक्षा संगीता यांनी सांगितले की, जेव्हा कोमलचे पती आमच्याकडे स्वत:च्या पत्नीचं लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा हे ऐकून आम्हाला अजब धक्काच बसला. परंतु जेव्हा मुलगी आणि इतर लोक राजी होते तेव्हा आम्ही लग्न करण्याची परवानगी दिली.