पतीने कोर्टात घटस्फोटासाठी सांगितलं असं कारण, वकिल-न्यायाधीश सगळेच हसले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:38 PM2024-02-08T16:38:07+5:302024-02-08T16:38:44+5:30
फ्रिजमध्ये रोज भाज्या खराब होतात. हेच या कपलच्या घटस्फोटाचं कारण आहे. ज्यांनीही हे कारण ऐकलं ते सगळेच अवाक् झाले.
रोज घटस्फोटाच्या वेगवेगळ्या कारणांच्या घटना समोर येत असतात. मात्र पश्चिम बंगालमधून घटस्फोटाचं जे कारण समोर ते फारच हैराण करणारं आहे. घरात जेवण तयार केलं जात नाही, फ्रिजमध्ये रोज भाज्या खराब होतात. हेच या कपलच्या घटस्फोटाचं कारण आहे. ज्यांनीही हे कारण ऐकलं ते सगळेच अवाक् झाले.
सामान्यपणे पती पत्नी विरोधात किंवा पत्नी पतीविरोधात केस दाखल करतात. पण तुम्ही कधीच ऐकलं नसेल तर एखाद्या कपलने फ्रिजमध्ये भाज्या खराब होण्यावरून एकमेकांना घटस्फोट मागितला असेल. जेव्हा कोर्टात या केसची सुनावणी होत होती तेव्हा तेथील वकीलही हसत होते. कारण त्यांनाही त्यांच्या जीवनात अशी केस मिळाली नव्हती.
ही केस एका सरकारी कर्मचाऱ्याने दाखल केली आहे. तो आरोग्य विभागात नोकरी करतो. पतीने सांगितलं की, सध्या भाज्यांचे भाव खूप वाढले आहेत की, एखाद जर त्यांना फ्रिजमध्ये ठेवलं तर त्या बाहेर निघण्याचं नावच घेत नाहीत. ज्यामुळे भाज्या आतच खराब होतात. अनेक भाज्या इतक्या खराब होतात की, त्या खाताही येत नाही. पतीचा दावा आहे की, अशा पत्नीसोबत राहण अशक्य आहे.
यासंबंधी पत्नीने आपली बाजू मांडत सांगितलं की, तिने जेवण बनवलं तरी ती खाऊ कुणाला घालणार? घरात बनवलेलं जेवण खाणं लोकांचं काम आहे. परिवारात 3 सदस्य आहेत. एका छोट्या परिवारासाठी असं किती जेवण लागतं. ज्यामुळे भाज्या फ्रिजमध्ये ठेवाव्या लागतात. नंतर त्या खराब होतात.
या कपलची कहाणी ऐकून त्यांचे वकीलही हसू आवरू शकले नाहीत. सूत्रांनुसार, नंतर दोन्हीकडील वकीलांनी बसून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर कधी तोडगा निघेल हे सांगता येत नाही. कारण नंतर पत्नीद्वारे करण्यात आलेली तक्रार महत्वाची आहे. ती म्हणाली की, तिचा पती परिवार चालवण्यासाठी अजिबात पैसे देत नाही आणि ज्यामुळे तीन महिन्यांपासून घर चालवणं अवघड झालं आहे. यावर पती म्हणाला की, जेव्हा दिवसभर काम करून तो घरी परत येतो तेव्हा त्याला जराही शांतता मिळत नाही.
पती म्हणाला की, हे दिवसेंदिवस सहन होण्याच्या पलिकडे गेलं आहे. अशात आता दोघांचं एका छताखाली राहणं अवघड झालं आहे. दोन्हीकडील वकीलांना वाटतं की, इतक्या छोट्या कारणावरून परिवार तुटू नये. त्यामुळे त्यांनी कपलला बोलवून वाद मिटवण्यास सांगितलं.