पती म्हणाला - तुझ्यामुळे गर्लफ्रेंड नाराज झाली, मग पत्नी पोलिसांकडे गेली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:13 PM2022-12-05T15:13:15+5:302022-12-05T15:14:48+5:30

Uttar Pradesh : हे सगळं तेव्हा समोर आलं जेव्हा पतीने खुलेआम पत्नीला सोडण्याची धमकी दिली आणि म्हणाला की, तुझ्यामुळे माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे.

Husband have a girlfriend then wife went to police station in Agra | पती म्हणाला - तुझ्यामुळे गर्लफ्रेंड नाराज झाली, मग पत्नी पोलिसांकडे गेली आणि...

पती म्हणाला - तुझ्यामुळे गर्लफ्रेंड नाराज झाली, मग पत्नी पोलिसांकडे गेली आणि...

Next

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. इथे एका पती-पत्नीच्या संसारात एका महिलेची एन्ट्री झाली आणि प्रकरण इतकं गंभीर झालं की, पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. हे सगळं तेव्हा समोर आलं जेव्हा पतीने खुलेआम पत्नीला सोडण्याची धमकी दिली आणि म्हणाला की, तुझ्यामुळे माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे.

गर्लफ्रेंडसाठी पत्नीला सोडण्यास तयार

ही घटना आग्रा जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एक महिला पतीविरोधात तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने सगळं प्रकरण पोलिसांना सांगितलं. तिने हेही सांगितलं की, तिचा पती तिच्यासोबत कसा वागतो आणि कसा तो गर्लफ्रेंडसाठी तिला सोडण्यासाठी तयार झाला. 

महिलेनुसार तिचं लग्न चार वर्षाआधी गुजरातच्या जामनगरमधील एका तरूणासोबत झालं होतं. पण काही दिवसातच तिचा पती तिला म्हणाला की, तू माझ्या लायक नाही. घरातील लोकांच्या सांगण्यानुसार मी तुझ्याशी लग्न केलं आणि माझी एक गर्लफ्रेंडही आहे. महिलेने सांगितलं की, पती कधीच तिला घराबाहेर फिरायला नेत नव्हता. जेव्हाही ती बाहेर जाण्याचं म्हणत होती तेव्हा तो काहीतरी कारण सांगून टाळत होता.

इतकंच नाही तर पती म्हणत होता की, तुझ्यामुळे माझी गर्लफ्रेंड नाराज होते. महिलेने असाही आरोप केला की, पती अनेक दिवस घरी जेवणच करत नाही आणि तो पतीच असण्याचं कर्तव्यही पूर्ण करत नाही. तिला फार एकटं वाटतं. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, हुंड्यासाठी अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता प्रकरणाची चौकशी केली जाईल.

Web Title: Husband have a girlfriend then wife went to police station in Agra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.