पत्नीसोबत भांडण झाल्यावर नवरा करायचं असं काम जे वाचून तुम्ही चक्रावुन जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:14 PM2022-01-05T18:14:30+5:302022-01-05T18:16:18+5:30

छोट्या-छोट्या भांडणांमुळे नातं आणखीच घट्ट होतं. मात्र ही भांडणं काही काळतच संपवली तर ठीक, अन्यथा काहीवेळा याच कारणामुळे नाती तुटल्याचंही पाहायला मिळतं.

husband made list of fights between him and wife | पत्नीसोबत भांडण झाल्यावर नवरा करायचं असं काम जे वाचून तुम्ही चक्रावुन जाल

पत्नीसोबत भांडण झाल्यावर नवरा करायचं असं काम जे वाचून तुम्ही चक्रावुन जाल

Next

पती-पत्नी (Husband and Wife Dispute) असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड (Girlfriend-Boyfriend) प्रत्येक नात्यात लहान मोठी भांडणं सुरूच असतात. अनेकदा तर तुम्ही असंही ऐकलं असेल की छोट्या-छोट्या भांडणांमुळे नातं आणखीच घट्ट होतं. मात्र ही भांडणं काही काळतच संपवली तर ठीक, अन्यथा काहीवेळा याच कारणामुळे नाती तुटल्याचंही पाहायला मिळतं.

नुकतंच असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात एका पतीने आपल्या पत्नीसोबत झालेल्या सर्व भांडणांची एक यादी करून ठेवली आहे. याबाबत माहिती देत महिलेनं एका रिलेशनशिप कॉलमध्ये आपल्या समस्येवर उपाय विचारला आहे. महिलेनं आपली समस्या (Relationship Problems) शेअर करत लिहिलं, की माझं लग्न एका अतिशय स्मार्ट आणि शांत व्यक्तीसोबत झालं आहे. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकाच घरात राहतो. मी हाउस वाईफ आहे आणि घरातच राहते. आमचा एक मुलगाही आहे, ज्याच्यावर दोघंही खूप प्रेम करतो.

माझं आणि माझ्या पतीचं काल रात्री भांडण झालं. हे भांडण फार मोठं नव्हतं मात्र भांडणानंतर काही वेळातच माझा पती तिथून निघून गेला. यानंतर त्याने आपला कॉम्प्यूटर अनलॉक केला आणि यात काहीतरी सर्च करू लागला. यानंतर त्याने यात एक लिस्ट शोधली आणि त्यात काहीतरी लिहू लागला. तो तिथून गेल्यावर मी ही लिस्ट पाहिली असता, यात त्याने मागील एका वर्षात आमच्या दोघांमध्ये झालेल्या प्रत्येक भांडणाविषयी यात लिहिलं होतं.

या लिस्टमध्ये त्याने त्या प्रत्येक भांडणाबद्दल लिहिलं होतं, जेव्हा पत्नीने त्याला त्रास दिला, भांडण केलं, धमकी दिली आणि त्यावेळी तोच बरोबर होता. पत्नीने पुढे सांगितलं की एकेदिवशी मी त्याला विचारलं की सगळं ठीक आहे का? यावर उत्तर देत त्याने सांगितलं की हो आपण ठीक आहोत...फक्त एक लिस्ट आहे..!

महिलेनं आपली ही समस्या सांगत म्हटलं की मी त्याच्यासोबत या लिस्टबद्दल बोलूही शकत नाही, कारण त्याला समजेल की मी त्याच्या पर्सनल गोष्टी लपून पाहते. मी काय करायला हवं? तो मला घटस्फोट देईल का? असे सवाल महिलेनं उपस्थित केले आहेत. यावर एक्सपर्टने तिला सल्ला दिला की तिने आपल्या पतीसोबत मनमोकळेपणाने बोलायला हवं. केवळ भांडणाबद्दलच नाही तर त्याच्या अडचणी तसंच बाकी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. यासोबतच तू ही लिस्ट पाहिली आहेस, हे देखील आपल्या पतीला सांग, असा सल्ला एक्सपर्टनी दिला आहे. शेवटी तू पतीसोबत भरपूर बोलायला पाहिजे, असंच त्यांनी महिलेला सांगितलं.

Web Title: husband made list of fights between him and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.