पत्नीला न सांगताच पतीने विकली तिची किडनी, वेगळ्या आजाराचं कारण सांगत केला तिचा घात...आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 01:13 PM2022-09-13T13:13:44+5:302022-09-13T13:14:04+5:30
Husband Sold Wife's Kidney : घटना ओडिशामधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची किडनी तिला न विचारताच विकली आणि त्यातून मिळालेले पैसे गायब केले.
Husband Sold Wife's Kidney : जगभरात फारच विचित्र प्रकारचे लोक असतात. अनेकदा लोक नाते, प्रेम आणि प्रेमाची किंमत पैशांसमोर काहीच समजत नाहीत. आपण अशा घटना ऐकून किंवा वाचून हैराण होतो. पण या लोकांना असं करताना जराही लाज वाटत नाही. एक अशीच घटना ओडिशामधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची किडनी तिला न विचारताच विकली आणि त्यातून मिळालेले पैसे गायब केले.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण लोक परिवारातील लोकांचा वापरही आपल्या फायद्यासाठी करतात. ओडिशातील कोडामेटा गावात रंजीता कुंडू नावाच्या महिलेने आपल्या पतीवर अजब आरोप केला आहे. महिलेने सांगितलं की, पतीने तिला न सांगता तिची किडनी काळ्या बाजारात विकली. तिला स्वत: चार वर्षांनंतर याबाबत समजलं आणि पतीच्या या कृत्यामुळे तिला धक्का बसला.
किडनी स्टोनच्या नावावर काढली किडनी
रंजीता कुंडू नावाच्या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिला न सांगता तिची किडनी विकली होती. ही घटना 4 वर्षाआधीची आहे. महिलेचा आरोप आहे की, 2014 आधी तिला पतीने किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
या दरम्यान पतीने डॉक्टरांसोबत मिळून तिची एक किडनी काढून ब्लॅक मार्केटमध्ये विकली. महिलेला याबाबत काहीच माहीत नव्हतं. कारण ती एनेस्थेशियाच्या प्रभावात होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती बांग्लादेशी आहे आणि शऱणार्थी म्हणून इथे राहत होता. त्यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली होती आणि त्यांना दोन मुलेही आहेत. पण 8 महिन्यांआधी तो पूर्ण परिवार मागे सोडून पळून गेला. आता महिला तिच्या आई-वडिलांसोबत राहते.
कसा झाला खुलासा?
महिलेच्या पोटाच्या खालच्या भागात वेदना झाल्याने ती डॉक्टरकडे गेली होती. जिथे तिला सांगण्यात आलं होतं की, तिला एकच किडनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुड्यांवरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. यादरम्यान पतीने तिची किडनी विकण्याचं कृत्य केलं. सध्या महिलेने पती आणि त्याच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत.