पत्नीला परीक्षेला जाण्यास उशिर झाल्याने पतीची आत्महत्या
By admin | Published: June 17, 2015 05:33 PM2015-06-17T17:33:14+5:302015-06-17T17:33:14+5:30
परीक्षेची वेळ सकाळी आठ वाजताची असून तिवारी व त्यांची पत्नी सकाळी दहा वाजता परीक्षेच्या ठिकाणी गेले. परीक्षेची वेळ चुकल्याने पती पत्नीमध्ये वाद झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १७ - पत्नीला परीक्षेसाठी उशिर झाल्याने तिच्या पतीने आत्महत्या केली.
पत्नीची परीक्षा असल्याने सहारा इस्टेट इथे नातेवाईकांच्या घरी योगेंद्र तिवारी (२५ वर्ष) व त्यांच्या पत्नी राहण्यासाठी आले होते. रविवारी सहारा इस्टेट येथे तिवारी यांच्या पत्नीची परिचारिका पदाकरता परीक्षा होती. त्या परीक्षेची वेळ सकाळी आठ वाजताची असून तिवारी व त्यांची पत्नी सकाळी दहा वाजता परीक्षेच्या ठिकाणी गेले. परीक्षेची वेळ चुकल्याने पती पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद सहारा इस्टेट या ठिकाणी नातेवाईकांच्या घरी गेल्यावरही रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री तिवारी यांनी त्यांची पत्नी झोपल्यानंतर गळफास घेत आपले जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या ठिकाणाहून कोणतेही पत्र सापडले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.