'मॅडम, पत्नी आंघोळच करत नाही, घटस्फोट हवा' काउन्सेलरकडे मागणी, पारोस्या पत्नीमुळं पती झाला हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:03 PM2021-09-22T14:03:58+5:302021-09-22T14:04:21+5:30
पतीची ही विनंती ऐकल्यावर काउन्सेलरही हैराण झाल्या. ही घटना अलीगढच्या चंडौस भागातील आहे. असं सांगितलं जात आहे की, दोन वर्षाआधी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं.
उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक पती आपल्या पत्नीला घटस्फोट देतोय कारण त्याची पत्नी आंघोळ करत नाही. वाचायला जरी हे विचित्र वाटत असलं तरी ही सत्य घटना आहे. शहरातील वुमन प्रोटेक्शन सेलमध्ये हे प्रकरण पोहोचलं आहे. आता काउन्सेलिंग करून दोघांनाही समजावलं जात आहे. जेणेकरून आपसातील वाद दूर करून ते सोबत रहायला तयार व्हावे. पतीने काउन्सेलिंग दरम्यान पत्नीकडून घटस्फोट हवा असल्याची मागणी केली. त्यावेळी त्याने पत्नी आंघोळ करत नसल्याचं कारण सांगितलं.
पतीने काउन्सेलरला सांगितलं की, 'मॅडम माझी पत्नी आंघोळ करत नाही. त्यामुळे मी तिच्यासोबत राहू शकत नाही. कुपया मला घटस्फोट द्यावा'. पतीची ही विनंती ऐकल्यावर काउन्सेलरही हैराण झाल्या. ही घटना अलीगढच्या चंडौस भागातील आहे. असं सांगितलं जात आहे की, दोन वर्षाआधी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. मुलगा चंडौसचा राहणार आहे तर मुलगी क्वार्सीची राहणारी आहे. (हे पण वाचा : रेस्टॉरंटमध्ये स्तनपान केलं म्हणून महिलेला काढलं बाहेर, परिसरातील संतप्त महिलांनी शिकवला धडा)
पती-पत्नी एकमेकांच्या सवयीने हैराण
दोघांमध्ये लग्न झाल्यावर सुरूवातीला सगळं काही ठीक होतं. पण त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद आणि भांडणं होऊ लागली होती. भांडणं इतके जास्त वाढले की, दोघेही एकमेकांच्या सवयीबाबत आणि राहणीमानाबाबत कमेंट करू लागले होते. यादरम्यान ९ महिन्याआधी दोघांना एक मुलगाही झाला. सर्वांना आशा होती की, मुलगा झाल्यावर दोघांमधील दूर होतील. पण तसं काहीही झालं नाही. वाद वाढले तेव्हा प्रकरण पोलीस आणि वुमन प्रोटेक्शन सेलकडे गेलं.
पत्नी म्हणाली माझ्यावर खोटे आरोप
यावेळी काउन्सेलर यांन पती आणि पत्नी दोघांनाही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. यादरम्यान पती, पत्नी आंघोळ करत नसल्याचं कारण देत घटस्फोटाची मागणी करू लागला होता. पती म्हणाला की, तो त्याच्या पत्नीमुळे या कारणाने हैराण आहे की, ती रोज आंघोळ करत नाही. तिच्या शरीराची दुर्गंधी येते. आता त्याच्या त्याच्या पत्नीसोबत रहायचं नाहीये. तर दुसरीकडे पत्नीने आरोप लावला की, तिच्यावर पती चुकीचे आरोप लावत आहे आणि तिला त्रास दिला जात आहे.