Husband Wife: पुन्हा लग्न करायला निघाला होता नवरा, पहिल्या पत्नीला समजताच लग्नमंडपात पोहोचली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:26 PM2022-03-28T21:26:22+5:302022-03-28T21:27:22+5:30
पहिली पत्नी लग्नाच्या मंडपातच पोहोचल्यानंतर तिने काही केलं ते...
Husband Wife: नवरा आणि बायकोचं भांडण किंवा वादविवाद हे कोणासाठीही आता नवीन राहिलेलं नाही. पण लग्न झालेलं असताना आणखी एक लग्न करायला जाणाऱ्या पुरूषाला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडलं तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा... असाच एक प्रकार नुकताच घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या तिसऱ्या लग्नासाठी जात असताना एका वराला त्याच्या पहिल्या पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् त्यानंतर पत्नीने त्याला जन्माची अद्दलच घडवली.
प्रसारमाध्यमातून मिळालेल्या वृत्तानुसार, एक युवक आपल्या तिसऱ्या लग्नासाठी जात होता. ही गोष्ट त्याच्या पहिल्या पत्नीला समजली. त्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं. पाकिस्तानच्या निजामाबाद भागात हा प्रकार घडला. नवरा लग्न करायला निघालाय हे समजताच पहिली पत्नी थेट त्या लग्न मंडपात जाऊन पोहोचली अन् त्यानंतर पत्नीने नवरदेव पतीला धू धू धुतलं. घडलेल्या प्रकारानंतर वराने पोलिसांत तक्रार दाखल केली. लग्नाच्या ठिकाणी जबरदस्तीने घुसून मारहाण केल्याचा आरोप त्याने केला.
युवकाचा वेगळाच दावा
पोलिसांनी सांगितले की, वराला ताब्यात घेण्याचे कोणतेही कारण नाही. दोन्ही पक्षांना अशा दिवाणी बाबी हाताळण्यासाठी कोर्टाकडे दाद मागण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, वराला दुखापत झाली असल्याने आणि त्याला हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई हवी असल्याने त्याला कायदेशीर औपचारिकतेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान नवरदेवाने सांगितले की, 'ती माझी पहिली पत्नी आहे. माझं तिच्याशी नातं संपलं आहे. तिने असं करणं चुकीचं आहे. काही दिवसांपूर्वीच आमचं नातं संपलं आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकारानंतर मी तिला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे आणि माझे वकीलही तिला समज देणार आहेत.
पण पत्नीने सांगितले की, पतीने २०१८ साली गुपचूप लग्न केले होते आणि आता त्याच पद्धतीने तिसरे लग्न करणार होता. पण त्याला रंगेहाथ पकडलं. तसेच, पाकिस्तानमधील मुस्लिम कौटुंबिक कायदा १९६१ च्या अध्यादेशानुसार, कोणत्याही व्यक्तीने पुन्हा लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे, असा दावाही तिने केला.