पाळीव कुत्र्यामुळे नवरा-बायकोत झालं कडाक्याचं भांडण, आता पत्नीने पतीसमोर ठेवली 'ही' अट..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:38 PM2024-05-13T15:38:00+5:302024-05-13T15:51:57+5:30
लग्नाच्या आधीपासून त्याच्याकडे कुत्रा आहेत. तर तरूणीला कुत्रा अजिबात आवडत नाही.
उत्तर प्रदेशच्या आग्रामधून पती-पत्नीच्या वादाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे पाळीव कुत्र्याची भांडी न धुतल्यामुळे नाराज पतीने पत्नीला घराबाहेर काढलं. आता पत्नीने घरी परत येण्यासाठी पतीसोबत एक अट ठेवली आहे. पत्नी म्हणाली की, घरात एकतर कुत्रा राहील किंवा मी. म्हणजे पतीला दोघांपैकी एकाची निवड करायची आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्यावरून झालेला पती-पत्नीमधील वाद आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आहे. पोलिसांनी पती-पत्नीच्या काउन्सेलिंगसाठी ही केस कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पाठवली आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्राने दोघांना पुढील तारीख दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जनपद आग्रा येथे राहणाऱ्या तरूणीचं लग्न दिल्लीमध्ये राहणाऱ्या तरूणासोबत झालं होतं. दोघांचं लग्न 2022 मध्ये झालं होतं. लग्नानंतर दोघेही सुखात राहत होते. तरूणाला परदेशी कुत्री पाळण्याची आवड आहे. लग्नाच्या आधीपासून त्याच्याकडे कुत्रा आहेत. तर तरूणीला कुत्रा अजिबात आवडत नाही.
घरातील कुत्र्यामुळे अलिकडे भांडणं होत होती. तरूण ऑफिसमधून आल्यावर पाळीव कुत्र्याला वेळ देत होता ज्याला पत्नी विरोध करत होती. तरूणाचं जास्त लक्ष कुत्र्याची काळजी घेण्याकडे लागली राहत होती. एक दिवस तरूण ऑफिसमधून लेट आला आणि पत्नीला त्याने कुत्र्याची भांडी स्वच्छ करण्यास सांगितलं. पण पत्नीने यासाठी स्पष्टपणे नकार दिला.
पत्नीच्या या वागण्यामुळे पती नाराज झाला आणि पत्नीसोबत त्याचा वाद झाला. वाद इतका वाढला की, पतीने पत्नीला घराबाहेर काढलं. पत्नी नाराज होऊन माहेरी परत आली. पत्नी गेल्या 2 महिन्यांपासून माहेरी राहते. माहेरी आल्यावर पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे केस कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवली. केंद्राने दोघांचं काउन्सेलिंग केलं.
काउन्सेलिंग दरम्यान कुत्र्यावरून भांडण झाल्याचं ऐकून काउन्सेलरही हैराण झाले. काउन्सेलर डॉ. गौड म्हणाले की, एक फारच अजब केस आली होती. पतीला कुत्रा पाळण्याची फार आवड होती. त्याने घरात एक कुत्रा पाळलाही आहे. पत्नीने त्या कुत्र्याची भांडी स्वच्छ केली नाही म्हणून पतीने पतीला घराबाहेर काढलं. यावरून दोघात वाद झाला आणि पत्नी नाराज होऊन माहेरी गेली. पत्नी म्हणाली की, एकतर कुत्रा त्या घरात राहणार नाहीतर मी त्या घरात राहणार. दोघांचं काउन्सेलिंग झालं पण वाद काही मिटला नाही. आता दोघांना पुढील तारीख देण्यात आली आहे.