Valentine's Day: पती-पत्नीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजून बजरंग दलाने केली मारहाण, मग त्यांनाच असं करणं पडलं महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 09:26 AM2023-02-15T09:26:31+5:302023-02-15T09:26:47+5:30
Husband Wife In Park: मीडिया रिपोर्टनुसार, फरिदाबादच्या तीन नंबर परिसरात ही घटना घडली. इथे पती-पत्नी एका गार्डनमध्ये फिरायला गेले होते. ही घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी घडली
Husband Wife In Park: व्हॅलेंटाईन डे चा दिवस सगळ्याच प्रियकर प्रेयसींसाठी खास असतो. भारतातही बरेच लोक हा दिवस आपल्या पद्धतीने साजरा करतात. पण काही लोक त्यांच्यासाठी अडचण निर्माण करतात. हरयाणाच्या फरिदाबादमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना एका गार्डन चांगलाच चोप देण्यात आला.
मीडिया रिपोर्टनुसार, फरिदाबादच्या तीन नंबर परिसरात ही घटना घडली. इथे पती-पत्नी एका गार्डनमध्ये फिरायला गेले होते. ही घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी घडली आणि गार्डनच्या आजूबाजूला बजरंग दलाचे काही कार्यकर्ते फिरत होते. गार्डनमध्ये बसलेले पती-पत्नी त्यांना प्रियकर-प्रेयसी वाटले. कशाताही विचार न करता या लोकांनी पती-पत्नीला मारहाण सुरू केली.
हा सगळा नजारा आजूबाजूचे स्थानिक लोक बघत होते. जेव्हा त्यांनी हे पाहिलं तर काही लोकांनी मिळून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पकडलं आणि त्यांना काठ्यांनी चांगलाच चोप देणं सुरू केलं. तिथे असलेल्या काही लोकांनी सांगितलं की, बजरंग दलाच्या लोकांना वाटलं की, ते कपल आहे. पण स्थानिकांनी जेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा झोडणं सुरू केलं तेव्हा ते लोक पळून गेले.
स्थानिक लोकांनी त्या लोकांची चांगलीच धुलाई केली. असंही सांगितलं जात आहे की, या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात दिसत आहे की, कशाप्रकारे स्थानिक लोकांनी त्यांना पकडून चोप दिला. सध्या स्थानिक प्रशासनाने याबाबत काहीही सांगितलं नाही.