पतीच्या डोक्यावर केस नाहीत....पती सेल्फी काढत नाही, मेरठमधील घटस्फोटाच्या विचित्र कारणांनी व्हाल हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:35 AM2021-03-15T11:35:45+5:302021-03-15T11:36:20+5:30
यूपीतील मेरठमधील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात घटस्फोटाची विचित्र कारणे समोर आली आहेत.
यूपीच्या मेरठमधील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात घटस्फोटासाठीची वेगवेगळी विचित्र कारणे समोर आली आहे. कुणी पतीला केस नाही म्हणून घटस्फोटाची मागणी केली आहे तर कुणी पती त्यांच्यासोबत सेल्फी घेत नाही म्हणून घटस्फोटाची मागणी केली आहे.
indiatimes.com ने दिलेल्या एका वृत्तानुसार, एका महिला लग्नाच्या १ वर्षानंतर फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात अशी तक्रार घेऊन आली की, तिने पतीच्या कुरळ्या केसांवर इम्प्रेस होऊन त्याच्यासोबत लग्न केलं होतं. आता ते केस राहिले नाहीत. पत्नीने सांगितले की, जेव्हा सोयरीक जुळली होती तेव्हा पतीच्या डोक्यावर कुरळे केस होते. त्याची पर्सनॅलिटी पाहूनच तिने लग्नाला होकार दिला होता. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)
ती म्हणाली की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचे केस हळूहळू गळत होते. आता त्याचं टक्कल पडलं आहे. त्यामुळे ती आता त्याच्यासोबत राहू शकत नाही. असं असलं तरी फॅमिली काउन्सेलिंग केंद्राने दोघांची चांगली काउन्सेलिंग केली आणि दोघांनाही समजलं. आता दोघेही सोबत राहतात.
सोबत सेल्फी काढत नाही पती
फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात पोहोचलेल्या अशाच एका दुसऱ्या महिलेने सांगितले की, तिचा पती तिच्यासोबत सेल्फी काढत नाही. त्यामुळे तिला पतीपासून घटस्फोट हवा आहे. दुसरीकडे पतीने पत्नीचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्याने दोघांचे सोबत असलेले काही सेल्फीही दाखवले. या दोघांचंही काउन्सेलिंग करण्यात आलं आणि त्यानंतर दोघेही सोबत राहू लागले. (हे पण वाचा : घटस्फोटाची 'ही' एकापेक्षा एक विचित्र कारणे वाचून कन्फ्यूजही व्हाल अन् चक्रावूनही जाल!)
मेरठ येथील फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात अशाप्रकारच्या साधारण २५०० ते ३००० घटस्फोटाच्या केसेस समोर आल्या आहेत. फॅमिली काउन्सेलिंग केंद्रात अशा कपल्सचं काउन्सेलिंग केलं जातं. त्यानंतर त्यांचं भांडण सोडवण्यासाठी एक फॉर्म्यूला सेट केला जातो.