दोन वर्षांपासून तरुणीला कंबरदुखीचा होता त्रास, डॉक्टरांनी सर्जरी करून काढली बुलेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:35 PM2019-12-26T12:35:56+5:302019-12-26T12:47:56+5:30
जगभरात अशा अनेक विचित्र घटना सतत घडत असतात ज्यांवर विश्वास ठेवणं फारच अवघड जातं. भारत असो इतर कोणताही देश नेहमीच आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडत असतात.
(Image Credit : patrika.com)
जगभरात अशा अनेक विचित्र घटना सतत घडत असतात ज्यांवर विश्वास ठेवणं फारच अवघड जातं. भारत असो इतर कोणताही देश नेहमीच आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. इथे एक १९ वर्षीय तरूणीला दोन वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास होता. पण जेव्हा डॉक्टरांनी एक्स-रे काढला तेव्हा कंबरदुखीचं खरं कारण समोर आलं.
येथील एनआयएमएम हॉस्पिटलमध्ये एक १९ वर्षीय तरूणीच्या पाठीच्या कण्यातून बंदुकीची गोळी म्हणजेच बुलेट काढण्यात आली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, असमा बेगम नावाच्या या तरूणीला गेल्या दोन वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास होत होता. हा त्रास वाढल्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये आली होती.
असह्य वेदना झाल्यावर तरूणी डॉक्टरांकडे आली तेव्हा तिचा एक्स-रे काढण्यात आला. ज्यात तिच्या पाठीच्या कण्यात एक बंदुकीची गोळी असल्याचे आढळून आले. तरूणीने सांगितले की, ही गोळी तिला कधी आणि कशी लागली याची काहीच कल्पना नाही. या घटनेनंतर पोलिसात आर्म्स अॅक्टची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तरूणीला गोळी कशी आणि कधी लागली याची चौकशी केली जात आहे.