एका मशिदीत सुरू केलं कोरोना सेंटर, फ्रीमध्ये होणार रूग्णांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:39 AM2021-05-26T10:39:05+5:302021-05-26T10:47:29+5:30
काही लोक असेही आहेत जे धर्माच्या वर जाऊन माणुसकीचा धर्म निभावतात. अशीच एक घटना हैद्राबादहून समोर आली आहे. इथे एका मशिदीला कोरोना सेंटर करण्यात आलं आहे.
कोरोना महामारीने आपल्याला खूपकाही शिकवलं आहे. आपण हे शिकलो की, जेव्हा असं काही संकट आपल्यावर येतं तेव्हा बरेच लोक एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येतात. काही लोक असेही आहेत जे या काळातही वाईट कामं करतात. गरजू लोकांना फायदा घेतात. पण काही लोक असेही आहेत जे धर्माच्या वर जाऊन माणुसकीचा धर्म निभावतात. अशीच एक घटना हैद्राबादहून समोर आली आहे. इथे एका मशिदीला कोरोना सेंटर करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही मशीद हैद्राबादच्या राजेंद्रनगरमध्ये आहे. या मिशिदीत एक शाळाही आहे. मिशिदीचं नाव आहे मस्जिद-ए-मोहम्मदी. या मशिदीत सध्या ४० बेडचं एक कोरोना आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आलं आहे.
इथे रूग्णांसाठी ऑक्सीजन बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या मेडिकल सुविधाही देण्यात आल्या आहेत. यात हेल्पिंग हॅंड फाउंडेशनने सुद्धा मशिदीची मदत केली आहे. त्यांनी सर्व सुविधा फ्रीमध्ये दिल्या आहेत.
इंडिया टाइम्सनुसार, इथे २० क्लासरूम्स आहेत. प्रत्येक रूममध्ये सोशल डिस्टंसिंगचा पालन करत ३ रूग्णांना ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. डॉक्टर, नर्सेस आणि रेस्ट एरियासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. एका फ्लोरवर महिलांसाठी वेगळी रेस्ट रूम आहे. फाउंडेशन ने ७५ लाख रूपये यासाठी डोनेट केले आहेत. इतकंच नाही तर २४ तास अॅम्बुलन्स सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कोरोना सेंटरमध्ये ५० लोकांचा स्टाफ आहे. ते तीन शिफ्टमध्ये काम करतात. यातील चार डॉक्टर, चार नर्सेस, आणि चार बेड साइड केअर करणारे लोक आहेत. या सर्वाची शिफ्ट ६ तासांची असेल. फिजिओथेरपिस्ट आणि डायटिशिअनही इथे असतील. सोबतच सफाई कर्मचारी आणि हेल्पर्सही असतील.