IAS अधिकाऱ्यानं शेअर केला ट्रेनच्या शौचालयातील फोटो; विचारलं, “हा मग साखळीतून कधी…”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 08:57 AM2022-07-31T08:57:57+5:302022-07-31T08:58:43+5:30

आयएएस अधिकाऱ्यानं हा फोटो शेअर करत एक प्रश्न विचारला आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट उत्तर दिली आहेत.

ias share photo of train toilet asked when this mug will be free from chain internet gave funny reply see social media viral jara hartke | IAS अधिकाऱ्यानं शेअर केला ट्रेनच्या शौचालयातील फोटो; विचारलं, “हा मग साखळीतून कधी…”

IAS अधिकाऱ्यानं शेअर केला ट्रेनच्या शौचालयातील फोटो; विचारलं, “हा मग साखळीतून कधी…”

Next

इंटरनेटवर काय कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मग तो एखादा फिल्म स्टार असो किंवा कोणता नेता किंवा विद्यार्थी, सरकारी अधिकारीही. सध्या एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कदाचित तुम्हालाही हसायला येईल. हा फोटो आहे आपल्या ट्रेनमधील शौचालयाचा.

एका आयएएस अधिकाऱ्यानं हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच यात त्यांनी मजेशीर प्रश्नही विचारला आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरीही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी हा फोटो शेअर केलाय. तसंच त्यासोबत त्यांनी ‘महिती नाही हा मग साखळीतून कधी मुक्त होणार’ असा प्रश्नही केला आहे.


हा फोटो ट्रेनच्या शौचालयामधील आहे. नळाला एक साखळी बांधण्यात आली आहे आणि त्याच्या सोबत साखळीनं मगही बांधण्यात आल्याचं यात दिसतंय. आतापर्यंत अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. आयएफएस परवीन कांस्वा यांनीदेखील यावर कमेंट करत मुक्त केलं तर गायबही होईल असं म्हटलं आहे. तर आणखी एका युझरनं साखळी नसती तर मग चोरीलाही गेला असता असं म्हटलंय.

Web Title: ias share photo of train toilet asked when this mug will be free from chain internet gave funny reply see social media viral jara hartke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.