बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:47 AM2021-05-28T10:47:38+5:302021-05-28T10:53:53+5:30

जगात मिठाचा एक असाही प्रकार आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. म्हणजे हे एक किलो मीठ खरेदी करण्यासाठी तुम्हाला लोन घ्यावं लागू शकतं.

Icelandic salt is the most expensive salt in the world | बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल!

बाबो! 'हे' आहे जगातलं सर्वात महागडं मीठ, किंमत इतकी की, खरेदीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल!

googlenewsNext

मिठाशिवाय कोणताही पदार्थ बेचव लागतो. मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाची टेस्ट समजत नाही. पदार्थाच्या टेस्टसाठी मिठाचं महत्व तर सर्वांनाच माहीत आहे. पण मीठ किती महागडं असू शकतं तुम्हाला माहीत नसेल. जगात मिठाचा एक असाही प्रकार आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. म्हणजे हे एक किलो मीठ खरेदी करण्यासाठी तुम्हाला लोन घ्यावं लागू शकतं.

जगातलं सर्वात महागडं मीठ

जगातलं सर्वात महागडं मीठ आइसलॅंडिक सॉल्ट आहे. हे मीठ फार महागडं आहे. पण तरी सुद्धा शेफ लोकांमध्ये हे मीठ फार लोकप्रिय आहे. हे मीठ केवळ ९० ग्रॅम घ्यायचं असेल तर तुम्हाला ११ डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, ८०३ रूपये मोजावे लागतील. तर १ किलो मीठ घेण्यासाठी जवळपास ८० लाख ३० हजार रूपये मोजावे लागतील. (हे पण वाचा : गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीश पेनाची निप का तोडतात? जाणून घ्या कारण...)

इतकं महाग असण्याचं कारण?

हे मीठ लक्झरीपेक्षा कमी नाही आणि याचा शोधही काही वर्षाआधीच लागला. आइसलॅंडिक सॉल्टला आइसलॅंडच्या उत्तर-पश्चिम भागात हातांनी तयार केलं जातं. हे मीठ आइसलॅंडमधील वेस्टफ्योर्ड्समधील सॉल्टवर्कच्या फॅक्टरीमध्ये तयार केलं जातं. हे ठिकाण डोंगरात आहे आणि वर्षातले अनेक दिवस बर्फवृष्टीमुळे बंद राहतं. एक रोड टनल तयार झाल्यावर १९९६ येथील स्थिती सुधारली होती. या ठिकाणी दरवर्षी १० मीट्रिक टन मिठाचं उत्पादन केलं जातं. अनेक आठवड्यांच्या मेहनतीनंतर हे मीठ तयार होतं. इथे सगळं काम हाताने केलं जातं. (हे पण वाचा : पत्त्यांमधील तीन राजांना मिश्या असतात, पण बदामच्या राजाला मिश्या का नसतात?)

कसं तयार होतं हे मीठ?

समुद्राचं पाणी मीठ तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये आणलं जातं. त्यानंतर एका मोठ्या बिल्डींगमध्ये ते पाइपद्वारे पाठवलं जातं. तिथे अनेक पूल बनवलेले आहे आणि प्रत्येक पूलमध्ये रेडीएटर्स असतात. या रेडीएटर्सच्या मदतीने पाणी वाहतं आणि पाणी गरम होतं. जसजसं पाणी वाफ होऊन उडतं,  तसतसं मीठ एका जागी जमा होऊ लागतं. टॅंक्सपासून ते पॅन आणि ड्रॉइंग रूमपर्यंत सर्व गरम पाण्याने भरलेलं असतं. आइसलॅंड सॉल्ट हलक्या हिरव्या रंगाचं असतं.
 

Web Title: Icelandic salt is the most expensive salt in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.