डोकॅलिटी झकास, जुगाड त्याहुनही भारी! बाईक धावते आता १० रुपयात ५० किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 08:48 PM2021-07-13T20:48:27+5:302021-07-13T21:14:54+5:30

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच लॉकडाऊनमुळे अनेकांचा धंदा, व्यवसाय बंद झाला. उपासमारीची वेळ आली. पण तुमच्याकडे जुगाड करण्याची डोकॅलिटी असली तर तुम्ही काहीही करू शकता. तेलंगणाच्या एका अवलियाने एक अशीच कुरापत केलीय. 

Idea best, Jugaad is even excellent ! electric Bike runs now 50 km for 10 rupees | डोकॅलिटी झकास, जुगाड त्याहुनही भारी! बाईक धावते आता १० रुपयात ५० किमी

डोकॅलिटी झकास, जुगाड त्याहुनही भारी! बाईक धावते आता १० रुपयात ५० किमी

Next

काही अवलिया असे असतात जे कठीण परिस्थीतही असा काही जुगाड करतात की त्या परिस्थीतीतून मार्ग निघतोच निघतो. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच लॉकडाऊनमुळे अनेकांचा धंदा, व्यवसाय बंद झाला. उपासमारीची वेळ आली. पण तुमच्याकडे जुगाड करण्याची डोकॅलिटी असली तर तुम्ही काहीही करू शकता. तेलंगणाच्या एका अवलियाने एक अशीच कुरापत केलीय. 


विद्यासागर नामक तेलंगणा येथे राहणाऱ्या या व्यक्तीने ही कुरापत केलीय. त्यांचे गॅरेज होते. ज्याचा धंदा लॉकडाऊनमुळे मंदीत होता. विद्यासागर यांना येण्याजाण्यासाठी पेट्रोलचा खर्चही परवडेनासा झाला. विद्यासागर यांनी गाड्यांच्या रिपेरिंगचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला पण काही काळातच त्यांच्या लक्षात आले की त्याशिवाय ते कोणतेही काम करू शकत नव्हते. मग विद्यासागर यांनी शक्कल लढवली. त्यांनी ऑनलाईन शॉपिंग साईवरून ७ हजार ५०० रुपयांची इलेक्ट्रॉनिक मशीन मागवली. त्या मशिनचा त्यांनी असा काही जुगाड केला की त्यांची बाईक इलेक्ट्रिक मशीनवर धावू लागली. त्यांनी पेट्रोल टँकच्या खाली ३० एसएस कॅपेसिटीची बॅटरी जोडली. ही बॅटरी चार्ज व्हायला ५ तास लागतात आणि त्याने १ युनिट वीज खर्च होते.

ही मोटरसायकल एकदा चार्ज केली की ५० किमी पर्यंत धावू शकते. तसेच यातील बॅटरी स्वत:च चार्ज होते. त्यांचे सहकारी अनिल जे मोटर मॅकेनिक आहेत त्यांनीही त्यांना मदत केली. आता त्यांच्या पेट्रोलचा खर्च २०० प्रति दिवसावरून १० रुपये प्रतियुनिट इतका आला आहे.

Web Title: Idea best, Jugaad is even excellent ! electric Bike runs now 50 km for 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.