दौंडच्या भीमा नदीत आढळलेल्या शंकराच्या १ टन वजनाच्या मुर्तीचा अखेर उलगडा
By manali.bagul | Published: January 1, 2021 04:59 PM2021-01-01T16:59:28+5:302021-01-01T17:05:31+5:30
Viral News in Marathi : नदी पात्रात ही भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करीत असून काही उत्साही लोकांनी दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे.
दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला होता. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात एक मूर्ती सापडली होती. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे. स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. या मुर्तीबाबत सध्या एक खुलासा करण्यात आला आहे.
दरम्यान या मुर्तीची पूजा सुरू करण्यात आली होती. जिरेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सोनबा मचाले यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माध्यमांमध्ये आलेल्या मूर्ती दौंड शहरापासून कुरकुंभ मार्गे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिरेगाव येथील असल्याची माहिती पुढे आली. तेथील श्री दत्त मंदिराच्यावर सोळा वर्षांपूर्वी ही मूर्ती बसविण्यात आली होती. सदर मंदिराच्या शिखराचे काम करावयाचे असल्याने महादेवाच्या मुखाची ही मूर्ती काढून ठेवण्यात आली होती. परंतु अशी मूर्ती मंदिरात जमिनीवर ठेवणे योग्य नसल्याचा विचार करून १९ महिन्यांपूर्वी ही मूर्ती दौंड मधील नदीत विसर्जित केली होती.
सरपंच भरत खोमणे यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे. नदी पात्रात ही भग्न मूर्ती सापडल्यापासून भाविक त्याची पूजा करीत असून काही उत्साही लोकांनी दुधाने मूर्तीस दुग्धाभिषेक देखील केला आहे. मंदिराच्या शिखराचे काम करायचे असमहादेवाची मूर्ती काढून ठेवली होती. परंतु ती भग्न झाल्याने विधीपूर्वक पूजा करून ट्रॅक्टर - ट्रेलर मधून आणत दौंड येथे ग्रामस्थांसह मी मूर्तीचे विसर्जन केले होते अशी माहिती समोर आली आहे.