अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 04:54 PM2023-05-12T16:54:12+5:302023-05-12T16:54:37+5:30

जर्नल आयसाइन्समध्ये पब्‍ल‍िश रिपोर्टनुसार, पाच प्रकारच्या गोष्टी डासांना सगळ्यात जास्त आकर्षित करतात.

If more mosquitoes in your home then first change your soap scientist told a reason | अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण...

अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण...

googlenewsNext

उन्हाळा सुरू झाला की, डासांचा त्रास खूप जास्त वाढतो. अशात डास पळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. कुणी अगरबत्ती लावतं तर कुणी लिक्विड क्वाईल. कुणी धूर करतं तर काही लोक क्रीम लावतात. पण हे करूनही तुमच्या घरातील डासांची संख्या कमी होत नसेल तर एकदा तुमचा साबण चेक करा. व्हर्जीनिया पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट आणि स्टेट यूनिवर्सिटीच्या संशोधकांना एका रिसर्चमध्ये आढळलं की, काही साबण डासांसाठी चुंबकासारखं काम करतात.

जर्नल आयसाइन्समध्ये पब्‍ल‍िश रिपोर्टनुसार, पाच प्रकारच्या गोष्टी डासांना सगळ्यात जास्त आकर्षित करतात. यात अमेरिकेत वापरलेल्या जाणाऱ्या साबणाचे चार ब्रांड आणि डासांची एक खास प्रजाती यांचा समावेश आहे. रिसर्चमध्ये आढळलं की, फळांचा गंध आणि लिंबाची गंध असणारे साबण डासांना जास्त आकर्षित करतात. याचं कारण शरीरावर फुलांचा सुगंध लावल्याने डासांसाठी मनुष्य आणि झाडांमध्ये फरक करणं अवघड जातं. ते झाड समजतात आणि चुंबकासारखे आकर्षित होतात.

अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी काही लोकांना वेगवेगळ्या सुगंधाचे साबण लावले. नंतर डासांची त्यांच्याजवळ येण्याच्या स्थितीच विश्लेषण केलं. यातून समजलं की, ज्या लोकांनी फुलांचा किंवा लिंबाचा सुगंध असलेला साबण लावला होता, त्यांच्याकडे डासांची संख्या जास्त होती. 

पण हे सगळ्या साबणांसोबत नाही झालं. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या काही साबणांसोबत हे झालं. भारतातही यापैकी काही साबणांचा वापर केला जोता. वैज्ञानिकांनुसार, डास फुलांचा सुगंध असलेल्या साबणांकडे यासाठी आकर्षित होतात, कारण जेव्हा त्यांना शोषण्यासाठी रक्त मिळत नाही तेव्हा ते फुलांचा रस शोषूण घेतात. त्यामुळे त्यांना तो सुगंध आवडतो.

रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, खोबऱ्याच्या सुगंधाने डासांना पळवलं जाऊ शकतं. रिसर्चचे लेखक क्लेमेंट विनागर म्हणाले की, साबणाचा गंध डासांची गंधाची प्रोफाइल बदलतो. खोबऱ्याचा किंवा व्हेनिलाचा सुगंध डासांना आवडत नाही. त्यामुळे ते जवळ येत नाहीत. जर तुम्ही यांचा वापर करून आंघोळ केली तर डास तुमच्या जवळ येणार नाहीत. 

द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांचं मत आहे की, खोबऱ्याच्या तेलाचा गंध औषधासारखा येतो. अशात जर तुम्हाला डासांपासून सुटका मिळवायची असेल तर शरीरावर खोबऱ्याचं तेल लावा. खोबऱ्याचा गंध असलेल्या साबणाचा वापर करा. अरोमा ऑइलचाही वापर करू शकता.

Web Title: If more mosquitoes in your home then first change your soap scientist told a reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.