टीनएजर्संना जास्त वेळासाठी झोपू दिलं तर अर्थव्यवस्थेते पडेल 5319 अब्ज रूपयांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 06:13 PM2017-09-15T18:13:10+5:302017-09-15T18:18:10+5:30
टीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल.
मुंबई, दि. 15- तरूण मुलं जास्त झोपतात अशी ओरड नेहमी ऐकु येत असते. जास्त झोपण्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त असतात, असंही नेहमी आपण ऐकत असतो. पण टीनएजर्स जर जास्त वेळ झोपले तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होइल, अशी एक बाब समोर आली. टीनएजर्स जर जास्त वेळ झोपू दिलं तर आयुष्यातील विद्यार्थी कमाईमध्ये डॉलर 17,500 ने म्हणजेच अकरा लाखापेक्षा जास्त रक्कमेची भर पडेल, असं द न्यूयॉर्क टाइम्सने अहवालात म्हंटलं आहे.
युएसमधील काही शाळा सकाळी साडेआठच्या सुमारास सुरू होतात. तसंच तेथिल 90 टक्के उच्च माध्यमिक शाळा आणि 80 टक्के माध्यमिक शाळा साडे आठच्या आधीही सुरू होतात. पण जर या शाळेच्या वेळेमध्ये बदल करून उशिराचा वेळ ठरवला तर तो मुलांनी दोन महिन्यांचा जास्त अभ्यास केल्याच्या बरोबरची आहे. याचाच अर्थ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याने जास्त ज्ञान मिळविल्यासारखा आहे. जर विद्यार्थ्यांना जास्त वेळासाठी झोपू दिलं तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार असून अर्थव्यवस्थेत 83 बिलियन डॉलरची (5319 अब्ज रूपये) भर पडेल. सहा इतर अभ्यासानुसार, जर शाळेची वेळ नियमीत वेळेपेक्षा 25 ते 60 मिनीट उशिराची असेल तर त्या मुलाला सकाळी 25 ते 77 मिनिटांची झोप जास्त घेता येइल.
पण यामध्ये इतर अनेक मुद्देही आहेत तेसुद्धा अहवालात नमुद करण्यात आले आहेत. मुलांना जास्त वेळ झोपू देण्यासाठी त्यांच्या पालकांना काही तोटे सहन करावे लागतील. पहिला तोटा म्हणजे प्रवासखर्चात होणारी वाढ. शाळेची वेळ जर उशिराची असेल तर जास्त रहदारीच्या वेळेत विद्यार्थ्याला प्रवास करावा लागेल अर्थातच प्रवासासाठी येणारा खर्च यामुळे वाढेल. शाळा उशिरा सुरू झाली तर सुटायची वेळही उशिराशी असेल. त्यामुळे पालक ऑफिसवरून घरी जाताना मुलांना शाळेतून घेण्याचा विचार करत असतील, तर तेही सोपं नाही. कारण शाळेची वेळ आणि पालकांची ऑफिसवरून निघायची वेळ सारखी होणार नाही. याव्यतिरिक्त, जास्त रहदारीच्या वेळी मुलाला प्रवास करावा लागणार असल्याने प्रति विद्यार्थी 150 डॉलर खर्च वाढेल, तर शाळांनासुद्धा याचा तोटा होइल. पायाभूत सुविधांसाठी शाळांचे सुमार डॉलर 110,000 खर्ची होतील.
तर दुसरीकडे, मुलांना जास्त झोप मिळाली तर त्याच्या शैक्षणिक यशात आणि विद्यार्थी कमाईमध्येही भर पडेल. विद्यार्थ्यालाच याचा फायदा होणार असल्याचं अहवालात म्हंटलं आहे.