हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए! या चिमुकलीचा फोटो पाहुन तुम्हीही हेच म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:44 PM2022-05-03T14:44:39+5:302022-05-03T14:48:49+5:30
या फोटोत त्यांनी एक चिमुकली अभ्यास करतेय. पण विशेष म्हणजे ती पक्ष्यांसाठीचे दाणे विकत हा अभ्यास करतेय.
जिद्दीसमोर यशाचे आकाशही ठेंगणे असते. एकदा माणसाने ठरवलं की जिद्दीने उभारी घ्यायची तर तो कोणत्याही परिस्थीतवर मात करु शकतो. मात्र हे जर एखाद्या लहान मुलीने शिकवले तर ते आणखीच मनाला स्पर्शुन जाते. मुर्ती लहान पण किर्ती महान दर्शवणारा हा फोटो तुमचं मन जिंकेल हे नक्की.
आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा फोटो शेअर केला आहे. सुशांत नंदा हे सोशल मिडियावर सक्रिय असतातच. त्यांचा हा फोटो म्हणजे सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे. या फोटोत त्यांनी एक चिमुकली अभ्यास करतेय. पण विशेष म्हणजे ती पक्ष्यांसाठीचे दाणे विकत हा अभ्यास करतेय.
या चिमुकलीचा फोटो शेअर होताच अनेकांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकरी या चिमुकलीचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. आतापर्यंत ५ हजार लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर सुशांत नंदा यांनी फारच सुंदर कॅप्शन दिली आहे. कवी दुष्यंतकुमार यांच्या कवितेतील, 'हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए' या ओळी शेअर केल्या आहेत.
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए💕 pic.twitter.com/nanuXhzIx7
— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 28, 2022