Alien : एकमेकांना सीक्रेट मेसेज पाठवतात एलिअन्स? वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:36 PM2021-08-06T18:36:31+5:302021-08-06T18:46:23+5:30

टेरी म्हणाले की, अशाप्रकारे एलिअन्स ब्रम्हांडात एकमेकांसोबत संपर्क करतात. ते ताऱ्यांमधून निघणाऱ्या प्रकाशात फोटॉनचा वापर करतात.

Imperial college London new study claims alien messages could be hidden in the stars | Alien : एकमेकांना सीक्रेट मेसेज पाठवतात एलिअन्स? वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा...

Alien : एकमेकांना सीक्रेट मेसेज पाठवतात एलिअन्स? वैज्ञानिकांचा आश्चर्यजनक दावा...

googlenewsNext

कदाचित तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, पण वेगवेगळ्या रिसर्चनुसार, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, एलिअन्स (Aliens) एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी ताऱ्यांचा (Stars)चा वापर करत असतील. वैज्ञानिकांनुसार, एलिअन्स ताऱ्यांच्या entangled photons चा वापर सीक्रेट मेसेज पाठवण्यासाठी करतात.

आयएफएल सायन्सच्या एका वृत्तानुसार, इंपेरिअल कॉलेज ऑफ लंडनच्या क्वॉन्टम फिजिसिस्ट टेरी रूडॉल्फ म्हणाले की, entangled photons किंवा quantum Entanglement तेव्हा तयार होतात जेव्हा प्रकाशाचे लिंक्ड पार्टिकल एकमेकांवर प्रभाव टाकतात. यात त्यांच्या अंतराने काहीही फरक पडत नाही.

टेरी म्हणाले की, अशाप्रकारे एलिअन्स ब्रम्हांडात एकमेकांसोबत संपर्क करतात. ते ताऱ्यांमधून निघणाऱ्या प्रकाशात फोटॉनचा वापर करतात. पण कुणीही हे संकेत समजू शकत नाही. ते याला लपवतात सुद्धा. बाहेरून बघणाऱ्यांना हे सामान्य वाटतं.

रिपोर्टनुसार, जेव्हा लेर बीमला क्रिस्टलमधून पास केलं जातं. तेव्हा एंटॅगलमेंट होतं. फोटॉन विभागले जातात आणि एंटॅगल्स फोटॉन एकत्र येतात. रिसर्चनुसार, हे फोटॉन अब्जो प्रकाशवर्षापर्यंत ट्रॅव्हल करतात आणि यादरम्यान एकमेकांवर quantum coherence चा प्रभाव टाकत राहतात.

एलियन्स पृथ्वीवर येण्याचा दावा

फ्यूचर टाइम ट्रॅव्हलर (Future time traveler) नावानं टिकटॉकवर एक अकाउंट आहे. त्या व्यक्तीनं हा दावा केला असून, त्याच्या म्हणण्यानुसार मानव आणि एलियन्स यांच्यात भयंकर युद्ध (War) होणार असल्याची माहिती आपल्याला असल्याचा दावा त्यानं केला आहे. इतकंच नव्हे तर, तो स्वत: 2491 या सालात सध्या जगत असल्याचं त्यानं म्हटलंय. या व्यक्तीनं एलियनची भेटीची तारीखही अगदी ठामपणे सांगितली आहे. त्याच्या मते, पुढच्या वर्षी २४ मे २०२२ रोजी दुसर्‍या ग्रहावरचे लोक अर्थात एलियन्स पृथ्वीवर येतील. पहिल्यांदाच ते पृथ्वीवर दिसतील. ते येताना शांततेनं येतील मात्र नंतर माणसाविरुद्ध युद्ध पुकारतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप वेगळे असतील. त्यांची उंची 7 फूट असेल आणि दिसायला अतिशय भयानक असतील. सध्या 2491 मध्ये जगत असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीच्या मते, आगामी काळात अनेक प्रकारचे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते पृथ्वीवरच वास्तव्य करतील. त्यांना निरॉन्स (Nirons) म्हणून ओळखले जाईल.

अगदी ठामपणे एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाबद्दल दावा करणाऱ्या या व्यक्तीकडे याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. मात्र तो पृथ्वीवर येणाऱ्या तथाकथित एलियन्सचं वर्णणही करतोय. तब्बल 7 फूट 4 इंच उंच आणि मोठी कवटी असलेले हे एलियन्स गडद राखाडी रंगाचे असतील. एकदा त्यांना युद्धासाठी चिथावल्यानंतर ते अत्यंत धोकादायक ठरतील, असं यानं म्हटलंय. तसंच या एलियन्सविरुद्ध अमेरिका (USA) पहिल्यांदा युद्ध पुकारेल असा दावाही त्यानं केलाय. या टाईम ट्रॅव्हलरला स्वत:चंही आयुष्य यामुळे धोक्यात येणार असल्याची भीती वाटतेय. ती त्यानं टिकटॉकवर व्यक्तही केलीय. त्याच्या या भाकीतावर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काही जण त्याचं भाकित खरं मानून भीतीही व्यक्त करत आहेत.
 

Web Title: Imperial college London new study claims alien messages could be hidden in the stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.