प्रेयसीला घेऊन औरंगाबादच्या हॉस्पिटलमधील टॉयलेटमध्ये गेला, आतून कडी लावली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:32 PM2022-02-11T16:32:55+5:302022-02-11T16:33:13+5:30

तरुण प्रेयसीसोबत वॉशरुममध्ये जात असताना एका कर्मचाऱ्यानं पाहिलं; रुग्णालयात एकच गोंधळ

in bihar youth takes his girlfriend to the washroom of hospital locked the door | प्रेयसीला घेऊन औरंगाबादच्या हॉस्पिटलमधील टॉयलेटमध्ये गेला, आतून कडी लावली अन् मग...

प्रेयसीला घेऊन औरंगाबादच्या हॉस्पिटलमधील टॉयलेटमध्ये गेला, आतून कडी लावली अन् मग...

Next

औरंगाबाद: प्रेमात पडलेले काही जण सगळ्या सीमा ओलांडतात, असं तुम्ही ऐकलं असेल. प्रेमात वेडी झालेली माणसं काय करतील, कशी वागतील याचा काही नेम नाही. बिहारच्या औरंगाबादमध्ये याचीच प्रचिती देणारी घटना घडली आहे. या ठिकाणी एक तरुण त्याच्या प्रेयसीला घेऊन सरकारी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात शिरला. त्यावेळी एका महिला कर्मचाऱ्यानं दोघांना पाहिलं.

औरंगाबादमध्ये एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला घेऊन सरकारी रुग्णालयातील महिला वॉर्डच्या स्वच्छतागृहात शिरला. स्वच्छतागृहात शिरताच त्यानं दरवाजा लावला. तितक्यात त्याला एका महिला कर्मचाऱ्यांन पाहिलं. तिनं आरडाओरडा केला. दरवाजा वाजवला. मात्र बराच वेळ दरवाजा उघडला नाही.

रुग्णालयातील स्वच्छतागृहात एक प्रेमी युगुल शिरल्याची माहिती मिळताच बाहेर गर्दी जमली. बराच गोंधळ झाला. स्वच्छतागृहात शिरलेल्या प्रियकरानं स्नानगृहाकडे उडी मारली. त्यानं उडी मारताच प्रेयसीनं दरवाजा उघडला. रुग्णालयात असलेल्या लोकांनी दोघांनाही पकडलं आणि त्यांची चौकशी सुरू केली.

आपण जिल्ह्यातल्या एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा भाचा असल्याचं प्रियकरानं सांगितलं. मात्र तो खोटं बोलत असल्याचं जमलेल्यांच्या लक्षात आलं. प्रेयसी आपली पत्नी असल्याचं सांगत प्रियकरानं सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेदेखील खोटं पकडलं गेलं. या दरम्यान प्रेयसीची स्थिती दयनीय झाली होती. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी त्यांना सोडलं. यासारखे प्रसंग आधीही रुग्णालयात घडले आहेत.

Web Title: in bihar youth takes his girlfriend to the washroom of hospital locked the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.