इथे सख्खे भाऊ-बहीण एकमेकांसोबत करत होते लग्न, काही देवांची दिली जात होती उदाहरणं...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:40 AM2023-08-29T10:40:36+5:302023-08-29T10:41:19+5:30
Egypt Marriage System: इजिप्तमधील शाही परिवार भावा-बहिणींचं लग्न लावत होते. कधी कधी तर वडील मुलीसोबतही लग्न करत होते.
Egypt Marriage System: इजिप्तच्या राजघराण्यांबाबत सांगितलं जातं की, ते परिवारातच लग्न करत होते. पण यात किती तथ्य आहे. तर हे सत्य आहे. इजिप्तमध्ये शाही परिवार असो वा सामान्य लोक त्यांचा पहिला प्रयत्न परिवारात लग्न करण्याचाच असतो. बरीच वर्ष या पद्धतीने लग्ने होत राहिली. त्यावेळी इथे रोमन राजेशाहीचा प्रभाव होता. पण त्याआधी भावा-बहिणीचं लग्न फार कमी लावलं जात होतं.
शाही परिवारात भावा-बहिणीचं लग्न
इजिप्तमधील शाही परिवार भावा-बहिणींचं लग्न लावत होते. कधी कधी तर वडील मुलीसोबतही लग्न करत होते. मार्केलो कैंपांगो ज्यांचा इजिप्तमधील लग्नांवर गाढा अभ्यास आहे त्यांनी यावर बरंच काही लिहिलं. सेनवोरेटने हा एक शासक होता ज्याने त्याच्याच बहिणीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर अमेनहोटेप 1 यानेही बहिणीसोबत लग्न केलं होतं. क्लियोपॅट्रा सेवेन हिनेही आपल्या भावासोबत लग्न केलं होतं. ही लिस्ट मोठी आहे.
रोमन लोकांचा प्रभाव
इजिप्तच्या राजघराण्यात अनेक पत्नी आणि वेश्या ठेवण्याचा चलन होता. कधी कधी यातून मुलांचाही जन्म होत होता. काही जाणकारांनुसार, अशाच काही लग्नांमुळे तुतनखामून चर्चेत आला होता. ते सांगतात की, ओसिरिस आणि आयसिस यांचं उदाहरण देऊन राजघराण्यातील अनेक लोकांनी आपल्या बहिणींसोबत लग्न केलं. इजिप्तच्या संस्कृतीमध्ये ओसिरिसला एक महत्वाचा देवता मानलं जातं. इजिप्त राजघराण्यात अशी मान्यता होती की, पृथ्वीवर ओसिरिस आणि आयसिसची सावली आहे.
जाणकार सांगतात की, सामान्य लोकांमध्ये भावा-बहिणीचं लग्न होण्याचं चलन रोमन शासनाच्या आधीपासून नव्हतं. पण रेकॉर्ड सांगतात की, भावा-बहिणींची लग्ने मोठ्या संख्येने होत होती. ओलाबेरिया नावाचे एक जाणकार सांगतात की, नवीन साम्राज्याच्या सुरूवातीनंतर इजिप्तच्या शब्दांमध्ये बदल झाल्याने भावा-बहिणींच्या लग्नांची माहिती मिळवणं अवघड आहे. उदाहरणार्थ 'snt' शब्दाचं भाषांतर बहिणीच्या रूपात केलं जातं. पण नवीन शासनात याचा वापर पत्नी किंवा प्रेयसी असा करण्यात आला होता.