शॉपिंगसाठी सुपरमार्केटमध्ये गेला, नशीब चमकलं अन् मिळाले 13 हजार 311 कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:08 AM2023-09-30T10:08:16+5:302023-09-30T10:08:25+5:30
या व्यक्तीने फ्लोरिडामध्ये जॅक्सनविलेच्या एका पब्लिक्स सुपरमार्केट मधून एक लॉटरी तिकीट खरेदी केली.
व्यक्ती कशीही असो कधी ना कधी त्यांचं नशीब चमकतं. अशीच नशीब चमकण्याची एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. इथे फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला मेगा मिलियन्स लॉटरीचा जॅकपॉट लागला आणि तो आता 1.6 बिलियन डॉलर म्हणजे 13 हजार 311 कोटी रूपयांवर आपला दावा करण्यासाठी समोर आला.
या व्यक्तीने फ्लोरिडामध्ये जॅक्सनविलेच्या एका पब्लिक्स सुपरमार्केट मधून एक लॉटरी तिकीट खरेदी केली. पण त्याने आपला दावा करण्यात थोडा उशीर केला. असं सांगण्यात आलं की, विनिंग तिकीटाचे नंबर ऑगस्टच्या सुरूवातीला काढण्यात आले होते.
अमेरिकेच्या कायद्यानुसार, लॉटरी किंवा मोठी रक्कम जिंकलेल्या व्यक्तीचं नाव 90 दिवस गुपित ठेवलं पाहिजे. फ्लोरिडामधील ही घटना यासाठीही खास आहे कारण यूएस लॉटरीच्या इतिहासात हे तिसऱ्यांदा झालं की, एखाद्याने इतकी मोठी रक्कम जिंकली. याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये एका व्यक्तीने 2.04 बिलियन डॉलर इतकी रक्कम जिंकली होती.
फ्लोरिडा घटनेतील व्यक्तीला आता हे ठरवावं लागेल की, त्याला सगळी रक्कम एकत्र हवी की 30 वर्ष विभागून हवी. काही झालं तरी त्याला टॅक्सच्या रूपात सरकारला मोठी रक्कम द्यावी लागेल.
लॉटरीच्या मालकांनी अजून या गोष्टीचा खुलासा केला नाही की, व्यक्तीने कोणता पर्याय निवडला. पण आधीच्या घटनेंमध्ये हेच बघण्यात आलं की, विजेते रक्कम एकत्रच मागतात. मेगा मिलियन्स अमेरिकेच्या 45 राज्यांमध्ये खेळली जाते आणि यात लॉटरी लागणं म्हणजे व्यक्तीचं नशीब उजळण्यासारखं आहे.