इथे तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही नवरी-नवरदेव, जाणून घ्या अजब कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:47 PM2022-10-06T12:47:42+5:302022-10-06T12:57:32+5:30
Weird Rituals : काही देशांमध्येे फारच विचित्र रिवाज असतात. असाच एक आगळावेगळा रिवाज इंडोनेशियामध्ये आहे.
Weird Rituals : लग्न म्हटलं किती रितीरिवाज असतात हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. देशातील वेगवेगळ्या भागात लग्नाबाबत वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. हे रितीरिवाज केवळ भारतातच नाहीतर इतरही अनेक देशांमध्ये असतात. काही देशांमध्येे फारच विचित्र रिवाज असतात. असाच एक आगळावेगळा रिवाज इंडोनेशियामध्ये आहे.
इंडोनेशियामध्ये लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याला टॉयलेटला जाण्यास बंदी असते. हा येथील एक अनोखा रिवाज आहे. हा रिवाज टीडॉन्ग समुदायातील लोक पाळतात. या समुदायातील लोक या रिवाजाला फार महत्वपूर्ण समजतात. या रिवाजानुसार नवीन जोडपं तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही. असे केल्यास तो अपशकुन मानला जातो.
स्थानिक लोकांनुसार लग्न ही एक पवित्र प्रथा आहे. आणि अशात ते लोक टॉयलेटला गेल्यास त्यांची पवित्रता भंग पावते. सोबतच नववधू वर याने अशुद्ध होतात.
इंडोनेशियामध्ये ही प्रथा पाळण्याचं आणखी एक कारण म्हणजे नववधू आणि वराला नजर लागू नये हेही आहे. त्यांचं असं माननं आहे की, टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. ते त्यांच्या शरीरातील घाण काढतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये नकारात्मक शक्ती असतात. लग्न झाल्यानंतर लगेच टॉयलेटला गेल्यास ती नकारात्मकता नव्या जोडप्यामध्येही प्रवेश करते.
इतकेच नाहीतर या लोकांची अशीही धारणा आहे की, लग्नानंतर लगेच टॉयलेटचा वापर केल्यास नवीन जोडप्याचं नातंही धोक्यात येतं. कधी कधी नातं तुटतं. दोघांनाही टॉयलेटला जावं लागू नये म्हणून दोघांनाही खाण्यासाठी कमी दिलं जातं. समुदायातील सर्व लोक हा रिवाज काटेकोरपणे पाळतात.