तब्बल ४ दिवसांचा फक्त १ प्रवास, देशात सर्वात जास्त किमी अंतर कापते 'ही' ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 04:12 PM2023-04-19T16:12:57+5:302023-04-19T16:13:56+5:30

३ वर्षांनंतर भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च स्वत: पेलण्यास समर्थ ठरली आहे

In just 1 journey of almost 4 days, this train covers the longest km in the India | तब्बल ४ दिवसांचा फक्त १ प्रवास, देशात सर्वात जास्त किमी अंतर कापते 'ही' ट्रेन

तब्बल ४ दिवसांचा फक्त १ प्रवास, देशात सर्वात जास्त किमी अंतर कापते 'ही' ट्रेन

googlenewsNext

भारतात रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे. देशातील बहुतांश लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. डोंगराळ भाग असो वा खडतर प्रदेश देशात रेल्वे नेटवर्क पोहचले आहे. परंतु तुम्हाला माहितीये का? असा कोणता रेल्वे मार्ग आहे जिथे देशात सर्वात मोठा प्रवास करणारी रेल्वे धावते? चला जाणून घेऊया. 

देशात सर्वात लांबीचा प्रवास करणाऱ्या ट्रेनचे नाव विवेक एक्सप्रेस आहे. जी डिब्रूगडहून कन्याकुमारीपर्यंत धावते. ही ट्रेन जवळपास ८२ तासांत ४ हजार १५० किमीहून अधिक अंतर कापते. या ट्रेनचा नंबर १५९०६ विवेक एक्सप्रेस असून डिब्रूगडहून संध्याकाळी १९.२५ मिनिटांनी ही ट्रेन सुटते. डिब्रूगडहून ४ हजार १५४ किमी प्रवास करून चौथ्या दिवशी रात्री १० वाजता ट्रेन कन्याकुमारीला पोहचते. ट्रेनचा हा प्रवास १२ हून अधिक राज्यातून जातो. 

प्रवासावेळी कोणत्या मोठ्या स्टेशनवरून ट्रेन जाते?
आसामच्या डिब्रूगडहून सुटलेली ही ट्रेन तामिळनाडूच्या कन्याकुमारीपर्यंत धावते. वेगवेगळ्या राज्यातून ती ट्रेन प्रवास करते. डिब्रूगड ते कन्याकुमारी या दरम्यान ही ट्रेन दिमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाईगाव कोकाराझार, न्यू अलीपूरद्वार, न्यू कुचबिहार, न्यू जलपाईगुडी, किशनगंज, मालदा टाउन, वर्धमान जंक्शन, बालासोर कटक भुवनेश्वर, विशाखापट्टनम, विजयवाडा, नेल्लोर, कोयंबटूर, एर्नाकुलम आणि त्रिवेंद्रम अशा प्रमुख स्थानकांवरून ती चौथ्या दिवशी कन्याकुमारी स्टेशनला पोहचते. 

प्रवासी वाहतुकीतून कमाईतून रेल्वे मालामाल
आर्थिक वर्ष २०२२-२३ या काळात रेल्वेला विक्रमी  २.४० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा महसूल ४९ हजार कोटी रुपयांनी जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ६१% वाढ झाली आहे. ३ वर्षांनंतर भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च स्वत: पेलण्यास समर्थ ठरली आहे. महसुलातील वाढ आणि खर्चाचे काटेकारे व्यवस्थापन यामुळे परिचालन गुणोत्तर ९८.१४ टक्के ठेवण्यात रेल्वेला यश आले. सर्व महसुली खर्चाची पूर्तता केल्यानंतर रेल्वेने भांडवली गुंतवणुकीसाठी ३,२०० कोटी रुपये आपल्या अंतर्गत स्रोतातून उभे केले आहेत.
 

Web Title: In just 1 journey of almost 4 days, this train covers the longest km in the India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे