1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:27 PM2023-01-13T15:27:01+5:302023-01-13T15:27:28+5:30

1959 Gold Old Bill: सध्या आम्ही तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्ही कधी विचार केला का की,  70 वर्षाआधी सोन्याची किंमत काय असेल. स्वातंत्र्यावेळी सोन्याची काय किंमत असेल याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल.

In the year of 1959 gold price old jwellery bill goes viral, know what was the gold price 70 year back | 1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्...

1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्...

googlenewsNext

1959 Gold Old Bill: भारतात सध्या सोन्याचे भाव आकाशाला भिडले  आहेत आणि आता लवकरच लग्नाची सीझनही सुरू होणार आहे. अशात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही एक्सपर्टचं मत आहे की, येणाऱ्या दिवसात सोन्याची किंमत 60 हजार रूपये पार करेल. पण सध्या आम्ही तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्ही कधी विचार केला का की,  70 वर्षाआधी सोन्याची किंमत काय असेल. स्वातंत्र्यावेळी सोन्याची काय किंमत असेल याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. आजच्या काळातील एक ग्रॅमची किंमत इतकी जास्त आहे की, त्यावेळचे लोक तेवढ्या पैशात 100 ग्रॅम पेक्षा जास्त सोनं खरेदी करू शकत होते.

70 वर्षाआधी किती होता सोन्याचा भाव

सोशल मीडियावर एक जुनं बिल व्हायरल झालं आहे. ज्यात दाखवण्यात आलं आहे की, त्यावेळी सोनं किती किंमतीत विकलं जात होतं. हे बिल 1959 सालातील आहे. त्यावेळी सोन्याची किंमत 113 रूपये असायची. पण टॅक्स गुरूं डॉट इन नुसार, 1960 मध्ये सोन्याची किंमत एक रूपयाने कमी 112 रूपये होती. हे बिल जर बारकाईने पाहिलं तर दिसेल की, हे जुनं बिल पुणे येथील सोनाराचं आहे आणि त्यावर दुकानाचं नावंही लिहिलं आहे. सगळ्यात वर वामन निंबाजी अष्टेकर लिहिलं आहे. तर त्यावर तारीख 3 मार्च 1959 लिहिली आहे. 

ज्या व्यक्तीने सोनं खरेदी केलं आहे त्याचं नाव शिवलिंग आत्माराम असं लिहिलं आहे. सोन्यासोबत त्यांनी चांदीचीही खरेदी केली आहे. हे बिल फारच जुन आहे. पण आज बिलाची किंमत खूप जास्त आहे. लोकांनी जसं हे जुनं बिल पाहिलं लोक हैराण झालेत. लोकांना विश्वास बसत नाहीये की, सोनं आधी इतकं स्वस्त होतं. 

Web Title: In the year of 1959 gold price old jwellery bill goes viral, know what was the gold price 70 year back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.