होऊ दे खर्च! डॉगीनं दिला ९ पिल्लांना जन्म; आनंदात मालकिणीची ४०० लोकांना पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 06:01 PM2023-11-09T18:01:48+5:302023-11-09T18:02:01+5:30

पाहुणचारासाठी पुरी, भाज्या तसेच भात आणि मिठाई तयार करण्यात आली होती.

In Uttar Pradesh, a dog gave birth to 9 puppies, the owner threw a party for 400 people | होऊ दे खर्च! डॉगीनं दिला ९ पिल्लांना जन्म; आनंदात मालकिणीची ४०० लोकांना पार्टी

होऊ दे खर्च! डॉगीनं दिला ९ पिल्लांना जन्म; आनंदात मालकिणीची ४०० लोकांना पार्टी

हमीरपूर - उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक अजब-गजब घटना समोर आली आहे. येथे एका पाळीव डॉगीनं ९ पिल्लांना जन्म दिला, ज्यांच्या आनंदात मालकिणीनं अख्ख्या कॉलनीला पार्टी दिली. तिने डॉगीचं कौतुक सोहळा आयोजित करत थाटामाटात गावात जल्लोष साजरा केला आणि संपूर्ण कॉलनीला जेवण दिले. एवढेच नाही तर महिलांनी सोहर गाणीही गायली. 'चटणी' असं या श्वानाचे नाव आहे.

ही घटना शहरातील मेरापूर भागातील आहे. जिथे एक गल्लीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कारण, येथे एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव श्वान 'चटणी' नं एकाच वेळी ९ पिल्लांना जन्म दिला होता. हा आनंद साजरा करण्यासाठी 'छठी' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी आजूबाजूच्या भागातील लोकांना बोलावण्यात आले होते.

पाहुणचारासाठी पुरी, भाज्या तसेच भात आणि मिठाई तयार करण्यात आली होती. ढोल-ताशासह महिला सोहर गीत गात होत्या. ज्याने हे दृश्य पाहिले त्याला धक्काच बसला. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. मेरापूरच्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये राहणाऱ्या राजकली यांनी 'चटनी' नावाची फिमेल डॉगी पाळली होती. सलग तिसऱ्या वर्षी चटणीने गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या रंगांच्या ९ पिल्लांना एकत्र जन्म दिला. सर्व पिल्ले निरोगी आहेत. या आधी जन्मलेली कुत्र्याची पिल्ले मोठी झाल्यावर दुसरीकडे राहायला गेली पण चटणीने राजकलीचे घर सोडले नाही.

राजकलीने सांगितले की, जेव्हापासून तिने हा कुत्रा घरात ठेवला आहे तेव्हापासून तिच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. चटणीने एकाच वेळी नऊ पिल्लांना जन्म देण्याचे हे तिसरे वर्ष आहे. साधारणपणे कुत्रा फक्त चार ते सहा पिल्लांना जन्म देतो. अशा परिस्थितीत राजकलीने आनंदाने या पिल्लांची 'छठी' ठेवली आणि कुटुंबासह शेजाऱ्यांना मेजवानी दिली.

या मेजवानीत चारशेहून अधिक लोक सहभागी झाले होते. ज्यांच्या पाहुणचारासाठी पुरी आणि भाजीबरोबरच छठी निमित्त बनवलेला भात आणि करी तयार केली होती. बुधवारी सायंकाळपासूनच पाहुण्यांच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती. रात्री उशिरापर्यंत छठीच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू होती. महिलांनीही सोहर गाणी गाऊन नृत्य केले. यावेळी 'चटणी'ला सुंदर सजवण्यात आली होती. महिलांनी तिच्यासोबत सेल्फीही काढली.

Web Title: In Uttar Pradesh, a dog gave birth to 9 puppies, the owner threw a party for 400 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.