भारत - पाकिस्तान सामन्याआधी अमिताभ बच्चन यांनी गायलं राष्ट्रगीत
By admin | Published: March 19, 2016 09:04 PM2016-03-19T21:04:40+5:302016-03-19T21:35:20+5:30
भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसलेल्या क्रिकेटरसिकांना बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या आवाजात राष्ट्रगीत ऐकण्याची संधी मिळाली
Next
ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. १९ - भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसलेल्या क्रिकेटरसिकांना बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या आवाजात राष्ट्रगीत ऐकण्याची संधी मिळाली. टी-20 वर्ल्ड कपमधील 'हाय व्होल्टेज' भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना सुरु होण्याआधी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत गायलं गेल. भारताचं राष्ट्रगीत गाण्याचा मान अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. तर पाकिस्तानचे क्लासिकल गायक शफकत अमानत अली यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले.
काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांनी ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रगीत गाणार असल्याच्या बातमीला दुजोराही दिला होता. अमिताभ बच्चन यांनी याआधी एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये समालोचनही केले आहे. बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) सूत्रांनी कॅबचे अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या प्रयत्नामुळे अमिताभ राष्ट्रगीत गाणार असल्याचे सांगितले.
अमिताभ बच्चन यांची ओळख म्हणजे त्यांचा आवाज असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांच्या आवाजात राष्ट्रगीत ऐकायला मिळणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. ईडन गार्डन्स मैदानवर त्यांना लाईव्ह ऐकण्याची संधी मिळाल्याने प्रेक्षकही आनंद व्यक्त करत होते.
The #IND National Anthem sung by @SrBachchan ahead of #INDvPAK#WT20https://t.co/NdXaA7665y
— ICC (@ICC) March 19, 2016