हात दाखवा रेल्वे थांबवा! भारतातील अशी रेल्वे जी रस्त्यात लोकांना देते लिफ्ट, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:33 PM2024-11-18T13:33:03+5:302024-11-18T13:59:58+5:30

हात दाखवा बस थांबवा, असं लिहिलेले बोर्ड तुम्ही अनेक पाहिले असतील, पण हात दाखवा रेल्वे थांबवा हे तुम्हाला माहीत नसेल.

India shortest train travel with only 3 coach know everything about it | हात दाखवा रेल्वे थांबवा! भारतातील अशी रेल्वे जी रस्त्यात लोकांना देते लिफ्ट, जाणून घ्या!

हात दाखवा रेल्वे थांबवा! भारतातील अशी रेल्वे जी रस्त्यात लोकांना देते लिफ्ट, जाणून घ्या!

India's Shortest Train: देशाची लाईफलाईन असलेल्या रेल्वेने तुम्ही कधीना कधी प्रवास केला असेलच. दिवसभरात शेकडो रेल्वे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात. प्रवासादरम्यान रेल्वे काही स्टेशनांवर काही वेळेसाठी थांबतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वेबाबत सांगणार आहोत, जी तुम्ही हात दाखवूनही थांबवू शकता किंवा असंही म्हणता येईल की, तुम्ही रेल्वेला लिफ्ट मागू शकता. हात दाखवा बस थांबवा, असं लिहिलेले बोर्ड तुम्ही अनेक पाहिले असतील, पण हात दाखवा रेल्वे थांबवा हे तुम्हाला माहीत नसेल.

उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये कोंच नगर ते सरसोकी स्टेशन दरम्यान पुन्हा एकदा सुरू होणारी ही रेल्वे इंग्रजांच्या काळातील आहे. १९०२ मध्ये ही रेल्वे ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. त्यानंतर ही रेल्वे १९१७ पर्यंत सुरूच होता. पण नंतर काही वर्षांसाठी बंद केली आणि आता पुन्हा सुरू केली आहे. या रेल्वेचं नाव आहे एट-कोंच शटल ट्रेन.

ही रेल्वे कोंच ते एट स्टेशन दरम्यान केवळ १३ किलोमीटरचा प्रवास करत होती. मात्र, सतत होत असलेल्या तोट्यामुळे ही रेल्वे बंद करण्यात आली होती. लोकांच्या मागणीवरून आता पुन्हा ही रेल्वे सुरू करण्यात आली. आता ही रेल्वे जालौनमध्ये कोंच नगर ते सरसोकी स्टेशनपर्यंत धावते.

इंजिनसोबत केवळ ३ कोच असलेल्या या रेल्वेची स्पीड ३० किमी प्रति तास आहे. म्हणजे तर तुम्ही सायकलने जरी गेले तरी रेल्वेच्या आधी पोहोचाल. १३ किमीचं अंतर पार करण्यासाठी या रेल्वेला ३५ मिनिटांचा वेळ लागतो. जर एखादा प्रवासी राहिला तर ही रेल्वे थांबून त्यांना बसण्याची संधी देते.

ही रेल्वे रोज दोनदा कोंच ते सरसोकी दरम्यान धावते. कोंच आणि एट स्टेशनदरम्यान मधे एकही स्टेशन नाही आणि कोणतंही स्टॉपही नाही. तरीही लोकोपायलट रस्त्यात कुणी हात दाखवला तर रेल्वे थांबवून त्यांना रेल्वेत बसू देतो. 

ही रेल्वे रेल्वेच्या मार्गात येणाऱ्या गावातील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी लोकांसाठी लाइफलाईन आहे. एच ते कोंच दरम्यान चालणारी ही एकच रेल्वे आहे. एट कोंच शटल ट्रेनचं भाडं १० रूपये, १५ रूपये आहे. 

Web Title: India shortest train travel with only 3 coach know everything about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.