मुंबईच्या तरूणाने बेलारूसमधील तरूणीसोबत केलं लग्न, वडील झाल्यावर सरकारकडून त्याला मिळाली इतकी रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:54 PM2023-01-23T14:54:05+5:302023-01-23T14:54:32+5:30
मिथिलेशनने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर बेलारूस सरकारने त्याला मोठी रक्कम दिली. सरकारकडून बाळाच्या संगोपनासाठी पालकांना काही रक्कम दिली जाते.
मुंबईत राहणारा मिथिलेश एक Travel Blogger आहे. त्याने बेलारूच्या लीजासोबत लव्ह मॅरेज केलं. लग्नापासून कपल बेलारूसमध्येच राहत आहे. नुकताच लीजाने एका बाळाला जन्म दिला. बाळाबाबतचा व्हिडीओ मिथिलेशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, त्याला दीड लाख रूपये मिळाले.
मिथिलेशनने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर बेलारूस सरकारने त्याला मोठी रक्कम दिली. सरकारकडून बाळाच्या संगोपनासाठी पालकांना काही रक्कम दिली जाते. मिथिलेश जेव्हा वडील झाला तेव्हा त्याला सुरूवातीला वन टाइम अमाउंट म्हणून 1 लाख 28 हजार रूपये मिळाले होते.
त्यानंतर त्याला तीन वर्ष 18000 रूपये प्रति महिना मिळणार आहे. पैसे थेट त्याच्या अकाऊंटमध्ये टाकले जाणार आहेत. बेलारूसमध्ये राहिला तरच त्याला ही रक्कम मिळणार.
मिथिलेशने सांगितलं की, त्याची पत्नी लीजाची डिलेव्हरी नॉर्मल झाली. त्याच्या बाळाचं वजन जन्मावेळ 4 किलो होतं. आता तो 2 महिन्यांचा झाला आहे. व्हिडीओत मिथिलेशचे वडिलही दिसत आहे. ते भारतातून तिथे गेले.
मिथिलेशचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्या या चॅनलवर 9 लाखांपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आहेत. यावर तो त्याच्या डेली रूटीनसंबंधी गोष्टी शेअर करत असतो. एका व्हिडीओत त्याने त्याची लव्हस्टोरीही सांगितली होती.
त्याने सांगितलं होतं की, मार्च 2021 मध्ये तो पहिल्यांदा रशियाला गेला. तिथे त्याला प्रियांशु नावाच्या एका व्यक्तीने बेलारूसला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मिथिलेश बेलारूसला गेला. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्याची पहिल्यांदाच लीजासोबत भेट झाली.
दोघांमध्ये सुरूवातीला ट्रान्सलेटरच्या माध्यमातून बोलणं होत होतं. कारण लीजाला केवळ रशियन भाषा येत होती आणि मिथिलेश इंग्रजी बोलायचा. काही भेटींनंतर मिथिलेशने लीजाला प्रपोज केलं. लीजाने सुद्धा मिथिलेशला होकार दिला. नंतर 25 मार्चला दोघांनी लग्न केलं.