दोन छोटेसे बहिणभाऊ पण महिन्याला कमवतात लाखो रुपये, आहे स्वत:ची बिझनेस कंपनी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:37 PM2021-10-18T15:37:32+5:302021-10-18T15:40:40+5:30
क्रिप्टो करन्सीला माइन करणे कठीण काम असते. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या दोन भारतीय मुलांनी हा भ्रम तोडला आहे. १४ वर्षाचा ईशान ठक्कर आणि ९ वर्षाची अनन्या ठक्कर यांनी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहे.
सध्याच्या जगात क्रिप्टो करन्सीचा बोलबोला वाढला आहे. क्रिप्टो करन्सीला माइन करणे कठीण काम असते. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या दोन भारतीय मुलांनी हा भ्रम तोडला आहे. १४ वर्षाचा ईशान ठक्कर आणि ९ वर्षाची अनन्या ठक्कर यांनी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहे.
सुट्ट्यांच्या दरम्यान क्रिप्टो माइनिंग सुरू
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारा ईशान हायस्कूलमध्ये शिकतो आणि युपीएनमध्ये मेडिसिनचे शिक्षण घेऊ इच्छितो. त्याची धाकटी बहिण अनन्या सध्या चौथ्या इयत्तेत आहे. सुट्ट्यांच्या दरम्यान लहान मुले खेळण्यात वेळ घालवतात. तर या दोघांनी बिटकॉइन आणि एथेरियम सारख्या क्रिप्टो करन्सीमध्ये माइनिंग करणे सुरू केले.
YOUTUBE वर माइनिंग शिकले
ईशानने आपल्या एलियनवेअर कॉम्प्युटरला ग्राफिक कार्ड वापरून ईथर माइनिंग रिंगमध्ये बदलले. जेणेकरून क्रिप्टो करन्सीच्या हाय - फाय साइट्स चालण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ईशान म्हणतात की, क्रिप्टो करन्सीशी संबधित माहिती त्याने युट्यूबवरून शिकली.
स्वतःची कंपनी सुरू
ईशान आणि अनन्याने क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करणे एप्रिल 2021 मध्ये सुरू केले. सुरूवातीला पहिल्यांदा ३ डॉलर म्हणजेच २२५ रुपये कमवले. त्यानंतर हा बिझनेस त्यांनी सुरू ठेवला आणि पहिल्या महिन्याच्या शेवटापर्यंत त्यांनी १ हजार डॉलर कमाई केली. ईशान आणि अनन्या यांनी एप्रिल २०२१ मध्ये आपली कंपनी फ्लिफर टेक्नॉलॉजीला सुरू केले.
इतके कमावतात दोन्ही भाऊ-बहिण
सप्टेंबरमध्ये जारी झालेल्या आकड्यांनुसार दोघांकडे ९७ हून अधिक प्रोसेसर आहेत. जे त्यांना प्रत्येक सेकंदाला १० मिलियनहून अधिक एल्गोरिदम बनवण्यासाठी मदत करतात. क्रिप्टो करन्सी माइनिंगच्या बिझनेसमुळे त्यांचे उत्पन्न २७ लाख रुपये (३६ हजार डॉलर) दर महिन्याहून अधिक असेल असा अंदाज आहे. ईशान आणि अनन्या कमावलेले पैसे ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी खर्च करणार आहेत.
क्रिप्टो माइनिंग म्हणजे काय?
हाय पॉवर कॉम्प्युटरचा वापर करून क्रिप्टोग्राफिक इक्वेशन सोडवून क्रिप्टोकरन्सी मिळवण्याच्या प्रक्रियेला क्रिप्टो माइनिंग म्हणतात. इक्वेशन सोडवणाऱ्या माइनर्सला क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पेमेंट केले जाते.