Indian Currency: कागद नव्हे, 'या' खास गोष्टीपासून तयार होते भारतीय नोट; जाणून आश्चर्य वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:35 PM2022-06-15T18:35:25+5:302022-06-15T18:43:31+5:30
Indian currency notes not made from paper : भारतीय रिझर्व बँक (RBI) करन्सी नोट तयार करताना कागदाचा वापर करत नाही. मात्र, अनेकांना असे वाटते, की त्यांच्या खिशातील नोट, ही कागदापासूनच (Paper) तयार करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँक (RBI) करन्सी नोट तयार करताना कागदाचा वापर करत नाही. मात्र, अनेकांना असे वाटते, की त्यांच्या खिशातील नोट, ही कागदापासूनच (Paper) तयार करण्यात आली आहे. जर आपल्यालाही, असेच वाटत असेल, तर आज आम्ही आपल्याला यासंदर्भात सविस्तर माहिती देत आहोत.
कापसाचा होतो वापर -
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, की भारतासह इतर अनेक देश करन्सी नोट तयार करण्यासाठी कापसाचा वापर करतात. याचे कारण म्हणजे, कापसाची (Cotton) काही खास वैशिष्टे. यात, ते वजनाला हलके असणे, अधिक काळ टिकू शकणे आमि प्रिंट करण्यायोग्य असणे, अशा काही वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. आरबीआयनुसार (RBI) नोट प्रिंट करण्यासाठी 100 टक्के कापसाचा वापर केला जातो.
फक्त आरबीआयलाच आहे अधिकार -
करन्सी नोटा तयार करण्यासाठी कॉटन, लिनन (Linen) आणि इतर गोष्टींचे प्रमाण बँकेने गुप्त ठेवले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या कलम 22 नुसार, केवळ रिझर्व्ह बँकेलाच (Reserve Bank) भारतामध्ये करन्सी नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. अर्थात रिझर्व्ह बँकेशिवाय इतर कुणीही, असे करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
अमेरिका देखील अशाच फॉर्म्युल्याचा करते वापर -
अमेरिका देखील आपल्या करन्सी नोटा तयार करण्यासाठी अशाच प्रकारचा फॉर्म्युला वापरते. एका रिपोर्टनुसार, अमेरिका 75% कॉटन आणि 25% लिननचा वापर करते.